Home | Maharashtra | Pune | Girish bapat and Nawab Malik in defamation case in Pune

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांविरोधातील मानहानीचा दावा गिरीश बापटांकडून मागे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 15, 2018, 07:58 AM IST

नवाब मलिक यांच्यावरील मानहानीचा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरिश बापट यांनी शुक्रवारी मागे घेतला.

 • Girish bapat and Nawab Malik in defamation case in Pune

  पुणे- राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाेव्हेंबर २०१५ मध्ये पत्रकार परिषद घेऊन अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी तूरडाळ वाटप प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आराेप केला हाेता. याप्रकरणी बापट यांनी याप्रकरणी मलिक यांच्याविराेधात पुणे न्यायालयात तक्रार दाखल करत अब्रुनुकसान व मानहानीचा दावा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणात मलिक यांनी न्यायालयात बापट यांच्यावर वैयक्तिक आरोप केले नव्हते, तर सरकारविराेधात अापण भूमिका मांडल्याचा खुलासा केला. त्यामुळे न्यायालयाने हे प्रकरण पुढे सुरू ठेवयाचे की नाही असा प्रश्न केल्यानंतर बापट यांनी मलिकविराेधातील तक्रार अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.ए.सय्यद यांच्या न्यायालयाने प्रकरण निकाली काढले. यामुळे मलिक यांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीला बापट आणि मलिक यांची न्यायालयात उपस्थिती होती.


  मलिक न्यायालयात म्हणाले, नाेव्हेंबर २०१५ राेजी याप्रकरणी मी पत्रकार परिषद घेतली हाेती. याबाबतच्या बातम्या प्रकाशित झाल्या हाेत्या. याप्रकरणात आपण बापट यांच्यावर वैयक्तिक भ्रष्टाचाराचे अाराेप केले नव्हते. सरकारच्या तूरडाळ अाणि डाळींवरील निर्बंध उठवण्याच्या धाेरणांवर टीका केली हाेती. बापट हे संबंधित खात्याचे मंत्री असल्याने केवळ त्यांचे नाव यात अाले हाेते, असे ते म्हणाले. या वेळी बापट म्हणाले, विराेधी पक्षांनी सरकारच्या धाेरणावर टीका करण्यात गैर नाही. मात्र, वैयक्तिक टीका करू नये.


  अाराेप करणे थांबवणार नाही : नवाब मलिक
  नवाब मलिक म्हणाले, तूरडाळ घाेटाळा हा मंत्र्याच्या चुकीच्या निर्णयामुळे झाला असून डाळींचे भाव वाढल्याने मी हा विषय त्यावेळी लावून धरला. मंत्र्यांनी याबाबत रीतसर प्रकरण दाखल केल्यानंतर न्यायालयाची नाेटीस मला अाली. त्यामुळे सुनावणीस मी न्यायालयात हजर राहत हाेताे. मात्र, मंत्र्यांना या प्रकरणाच्या सुनावणीत रस नसल्याने ते गैरहजर राहत हाेते. प्रकरण मागे घेण्याचा अधिकार हा गिरीश बापटांचा होता. सरकारच्या चुकीच्या धाेरणांवर यापुढेही अापण अाराेप करणे थांबवणार नाही. सिडकाेच्या अध्यक्षपदी प्रशांत ठाकूर यांच्याबाबतही आपण लवकरच भूमिका मांडणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.


  सबळ पुराव्यांअभावी अाराेप चुकीचे : बापट
  मंत्री बापट म्हणाले, सरकारने ५१ काेटीची तूरडाळ वाटप केली. मात्र, विराेधकांनी या प्रकरणात दहा हजार काेटींचा भ्रष्टाचार झाल्याचे सांगत बदनामी केली. तसेच मी देखील भ्रष्टाचार केल्याचे सांगितले. वैयक्तिक आरोप मी कधीही सहन करत नाही. त्यामुळेच मी न्यायालयात तक्रार केली. अन्नधान्याचा पुरवठा हा केंद्र आणि राज्य सरकारच्या धाेरणाप्रमाणे करावा लागतो. मलिक यांनी माझ्यावर व्यक्तिगत अाराेप नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केल्याने मी त्यांच्याविरोधात तक्रार मागे घेतली. मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याने बोलणे हा त्यांचा अधिकार अाहे. मात्र, सबळ पुराव्याअभावी त्यांनी अाराेप करणे चुकीचे अाहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

 • Girish bapat and Nawab Malik in defamation case in Pune
 • Girish bapat and Nawab Malik in defamation case in Pune
 • Girish bapat and Nawab Malik in defamation case in Pune
 • Girish bapat and Nawab Malik in defamation case in Pune

Trending