Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Girl death after Vomiting in Bhusawal

हरितालिकेच्या उपवासादरम्यान उलटी होऊन तरुणीचा मृत्यू; बोदवड येथील शारदा कॉलनीतील घटना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 14, 2018, 06:19 PM IST

उलटी झाल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री अकरा वाजता घडली.

  • Girl death after Vomiting in Bhusawal

    भुसावळ- बोदवडला हरितालिकेच्या उपवासादरम्यान उलटी होऊन तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजता घडली. राजश्री संजय महाजन (२०) असे मृत तरुणीचे नाव आहे. राजश्री ही बोदवड येथे शारदा कॉलनीमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होती.

    बुधवारी हरितालिकेचा उपवास होता. राजश्री हिनेदेखील हा उपवास केला. मात्र, सायंकाळी तिला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे वडिलांनी तिला खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, त्यानंतरही तिची प्रकृ़ती अधिक बिघडली. उपचारादरम्यान तिला पुन्हा उलटी झाली. यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Trending