Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Girl Student Car Collapsed In A 20-ft Deep Gully in Sinnar

विद्यार्थिंनींना घेऊन जाणारी तवेरा 20 फुट खोल नाल्यात कोसळली, आठ विद्यार्थिनींसह चालक जखमी

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 10:38 AM IST

सिन्नर-घोटी महामार्गावर पांढुर्ली शिवारात शालेय विद्यार्थिनींना घेऊन जाणारी तवेरास अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे २

  • Girl Student Car Collapsed In A 20-ft Deep Gully in Sinnar

    पांढुर्ली- सिन्नर-घोटी महामार्गावर पांढुर्ली शिवारात शालेय विद्यार्थिनींना घेऊन जाणारी तवेरास अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे २० फूट खोल नाल्यात उलटून झालेल्या अपघातात आठ विद्यार्थिनींसह चालक जखमी झाला. जखमींवर धामणगावच्या एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


    पांढुर्ली येथील जनता महाविद्यालयाच्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनी शुक्रवारी (दि. ३१) सकाळी आगासखिंड फाट्यावरून तवेरामध्ये (एम.एच. ०४ इअो ४७५५) बसून जात असताना कोळवाहळ नाल्यावरील पुलाजवळ अज्ञात वाहनाने हुलकावणी दिली. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी २० फूट खाली कोसळली. नाल्यात पाणी असल्याने अपघाताची तीव्रता कमी झाली. चालक विजय कृष्णा कर्मे (२०, रा. बोरखिंड) याच्यासह मोनिका दिलीप फोकणे (१७), हर्षदा सुरेश बरकले (१७), शीना परशराम बेंडकोळी (१७), राणी सुरेश आरोटे (१७), प्रियंका नंदू लहांगे (१७), श्रद्धा सुरेश बरकले (१७), आकांक्षा प्रकाश बरकले (१७), पूजा भाऊराव लहांगे (१७, सर्व रा. अागासखिंड) जखमीं झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू अाहेत.

Trending