आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमा तुझा रंग कसा..प्रियकराने प्रेयसीवर केरोसिन ओतून जिवंत जाळले, राहत होते लिव्ह इनमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- एका तरुणीला तिच्या प्रियकराने जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष नगरमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली. सलमान असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सलमान याने प्रेयसीच्या अंगावर केरोसिन ओतून ‍तिला जिवंत जाळले.

 

काय आहे हे प्रकरण?

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सायना असे पेटविण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ती मुळची पंजाबची रहिवासी होती.

 

सायना सलमानसोबत‍ लिव्ह इनमध्ये राहात होती. नंतर दोघांनी लग्न केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. तेव्हापासून सलमान हा सानियापासून दूर राहत होता. मात्र, सलमान बुधवारी सकाळी सकाळी अचानक घरी आला आणि त्याने सानियाच्या अंगावर केरोसिन ओतून तिला पेटवून दिले. नंतर सलामानने थेट पोलिस स्टेशन  गाठले आणि आपला गुन्हा कबूल केला. सानिया जवळपास 90 टक्के भाजली होती. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सलमानला पोलिसांनी अटक केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... घटनेशी संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...