आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- प्रेम प्रकरणातून 19 वर्षीय प्रेयसीचा वायरने गळा अावळून प्रियकराने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना पुण्याच्या नवी सांगवीतील औध उरो रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीत बुधवारी उघडकीस आली. आदिती श्यामसंदुर बिडवे (19, रा. अंबाजोगाई) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे, तर नेर्इमोद्दीन बिल्कोसोद्दीन शहा (21,रा. लातूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
नेर्इमोद्दीन व आदिती अंबाजोगाई येथील एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. काही महिन्यांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. आदिती ही शिक्षणासाठी चार महिन्यांपूर्वी अंबाजोगार्इ येथून पुण्यातील सांगवी भागात राहणाऱ्या चुलत्यांकडे राहण्यास आली होती. ती बीएचे शिक्षण घेत होती. मंगळवारी दुपारी एक वाजता तिचा प्रियकर नेर्इमोद्दीन लातूरहून पुण्यातील तिच्या घरी आला. या वेळी घरी कोणी नव्हते. कुठल्या तरी कारणावरून दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात नेर्इमोद्दीन याने आदितीचा वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने स्वत:ही फॅनला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
काही वेळाने आदितीचा चुलत भाऊ घरी आल्यानंतर त्याने घराची बेल वाजवली. मात्र, घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मित्राच्या मदतीने त्याने दरवाजा तोडला असता आदिती मृत अवस्थेत पडलेली, तर नेर्इमोद्दीन याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे त्याने याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.