आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सिम्बायोसिस : आजी-माजी विद्यार्थिनींच्या प्राध्यापकांवरील आरोपांनंतर महाविद्यालयाकडून माफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- #MeToo या माेहिमेअंतर्गत साेशल मीडियावर देशभरातील अनेक महिला लैंगिक अत्याचाराबाबत उघड भूमिका मांडत असल्याने खळबळ उडाली अाहे. मात्र, पुण्यातील नामांकित सिम्बायाेसिस महाविद्यालयाच्या अाजी-माजी विद्यार्थिनींनी साेशल मीडियावर भूमिका मांडत प्राध्यापकांवर लैंगिक अत्याचाराचे गंभीर अाराेप केल्याने खळबळ उडाली असून हे लाेण बाॅलीवूड, मीडियानंतर महाविद्यालयांपर्यंत पाेहोचल्याचे स्पष्ट झाले अाहे. 


याप्रकरणी सिम्बायाेसिस प्रशासनाने एक निवेदन तयार करून ते साेशल मीडियावर प्रसिद्ध केले असून ‘महाविद्यालयाचा परिसर लैंगिक शाेषणमुक्त राहण्यासाठी अाम्ही विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधत असल्याचे’ स्पष्टीकरण दिले अाहे. पुण्यातील सिम्बायाेसिस सेंटर फाॅर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील अाजी-माजी दहा विद्यार्थिनींनी याबाबत साेशल मीडियावर व्यथा मांडली अाहे.


तक्रारी देण्याचे आवाहन
प्राध्यापकांविरुद्ध तक्रारीची ‘सिम्बायोसिस’ने  गंभीर दखल घेत फेसबुक पेजवर दिलगिरी व्यक्त करणारे पत्र लिहिले. तसेच त्रिसदस्यीय चाैकशी समितीकडे तक्रारी देण्याचे अावाहनही केले अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...