आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावलमध्ये चक्क सोन्याच्या गणपतीची स्थापना; पालखीतून निघणार विसर्जन मिरवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- ‘सोन्याचा गणपती’ अर्थात सोन्या नावाच्या मुलाने बसवलेला गणपती, अशी खमंग चर्चा तुम्ही सोशल मीडियावर ऐकली असेल. मात्र, शहरात प्रत्यक्षात सोन्याच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. चारशे तरुणांनी एकत्र येऊन यंदा सोन्याचा गणपती बसवून नवा पायंडा पाडला आहे.

 

तरुणांनी पैसे जमा करून 25 ग्रॅम (अडीच तोळे) सोन्याची जवळ 78 हजार रुपये किंमत असलेली सोन्याची गणपतीची मूर्ती बसवली आहे. गणेशोत्सव मोठा्या थाटात साजरा होत असून शेवटच्या दिवशी सोन्याच्या गणपतीची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

शहरात व तालुक्यात या सोन्याच्या गणपतीची सर्वत्र चर्चा आहे. गणेशोत्सव साजरा करतांना मोठे डेकोरेशन, भव्य लायटिंग, उंच व मोठी मूर्ती आणि विर्सजनाकरीता वाद्यांवर होणारा मोठा खर्च, त्यातून होणारे प्रदूषण या सर्व वायफळ खर्चाला फाटा देत शहरातील तरूणांनी समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.


शहरातील 20 ते 22 वर्षे वयोगटातील सुमारे 400 तरुणांनी एकत्र येऊन ‘देव बरोबर करतो मित्र मंडळ’ स्थापन केले. या मित्र मंडळाने व्यास नगरीचा राजा, सोन्याचा गणपती असे नामकरण करून या वर्षापासून थेट सोन्याचा गणपती बसवला. अकरा दिवसाचा गणेशोत्सव ते साजरा करीत आहे. शहरातील मेन रोडावरील चावडीजवळ एका छोट्याशा जागेत सुंदर सजावट करून काचेच्या फ्रेममध्ये सोन्याची मूर्ती ठेवली आहे. तेव्हा शहरातील तरुणांनी यंदा राबविलेला हा उपक्रम खूपच चर्चेचा विषय ठरला आहे. या मंडळाचे अध्यक्ष मनीष चौधरी व उपाध्यक्ष राहुल महाजन आहेत त्यांना जगदिश कवडीवाले, गोपाल चौधरी अभिमन्यू चौधरी, विवेक सोनार, सोनु सोनार सह जेष्ठांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. शहरात या मुलांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जगदिश गडे, सुमित सोनार, सचिन अडकमोल, विक्की चौधरी, सचिन जासुद, राहुल कोळी मास्टर, प्रशांत फेगडे, सोनू डिजे, हर्षल ठाकरे  परिश्रम घेत आहेत. 

 

यथाशक्तीनुसार वर्गणी..

शहरातील तरुणांनी बाहेरून वर्गणी करण्यापेक्षा स्वत:हाचे आपल्या यथा शक्तीप्रमाणे निधी एकत्र केला. काही दानशुरांची मदत घेत 78 हजार रूपये एकत्र केले आणि अडीच तोळे सोन्याची लहान सुंदर मुर्ती पिंटू सोनार यांनी तयार करून दिली आहे.


 विधिवत पूजन व विसर्जन
अकराव्या दिवशी पालखी मिरवणूक संपूर्ण शहरातून काढून या गणरायाला निरोप दिला जाईल व सोन्याच्या या मूर्तीचे विसर्जन करून एक गाठ सोनं तयार करून सुरक्षित ठेवले जाईल व पुढच्या वर्षी पुन्हा त्यात अजुन पैसे टाकून मुर्तीचा आकार वाढवला जाईल व दरवर्षी त्यात वाढ करण्याचा मंडळाने निर्णय घेतला आहे.

 

कुतूहलाचा विषय
मंडळाच्या वतीने सुंदर असा एक छोटासा देखावा व त्यात काचेच्या फ्रेममध्ये सुरक्षित रित्या गणरायाची सोन्याची मूर्ती स्थापन करून ठेवले. 'सोन्याचा गणपती' असा बोर्ड त्याठिकाणी लावला तर मेन रस्त्यावर असलेल्या या गणेश मंडळाकडे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे व कुतूहलाचा विषय ठरत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. यावलमधील सोन्याच्या गणपतीचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...