आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसूती काळात केंद्र सरकार देणार 7 अाठवड्यांचा पगार: कंपन्यांत 15 हजारांवर पगार असलेल्यांनाच लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास अाता नव्या नियमानुसार २६ अाठवडे रजा मिळणार अाहे. पूर्वी ही सवलत फक्त १२ अाठवड्यांपर्यंतच मिळायची. या वाढीव १४ महिन्यांपैकी ७ महिन्यांचा पगार केंद्र सरकार संबंधित महिलेला देणार अाहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने गुरुवारी ही घोषणा केली. 


संबंधित महिला काम करत असलेल्या खासगी कंपनीकडून गर्भवतीस प्रसूती काळात वाढीव रजा देण्यास टाळाटाळ होऊ नये शिवाय कंपनीलाही अार्थिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला अाहे. मात्र, ज्या महिलेस १५ हजारांपेक्षा जास्त पगार मिळतो, अशाच खासगी व सरकारी कंपनीत काम करणाऱ्या महिला या सवलतीसाठी पात्र ठरतील, अशी माहिती या मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव यांनी दिली.


केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या मते, आम्ही यापूर्वी खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना १४ आठवड्यांची अतिरिक्त प्रसूती रजेची तरतूद केली होती. यासाठी अर्धा म्हणजे ७ आठवड्यांचा पगार कंपनीला सरकार करणार आहे. त्यामुळे प्रसूतीनंतर कामावर रुजू होण्यासाठी महिला कर्मचाऱ्यास कोणतीही अडचण कंपनी निर्माण करणार नाही. कामगार विभागानेही या प्रस्तावास अनुकूलता दर्शवली आहे. ही रक्कम कामगार कल्याण सेसमधून देण्यात येणार आहे. या फंडात मार्च २०१७ पर्यंत ३२ हजार ६३२ कोटी रुपये होते.  यापैकी फक्त साडेसात हजार कोटी इतकी रक्कम वापरली गेली आहे.

 

प्रसूती लाभ (दुरुस्ती) २०१६ ठळक बाबी
* पहिल्या व दुसऱ्या मुलांसाठी २६ आठवड्याची प्रसूती रजा मिळेल.  
* याहून जास्त मुलांसाठी १२ आठवड्यांची रजा मिळेल.  
* तीन महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दत्तक घेणाऱ्या अथवा सरोगेट मातांना १२ आठवड्यांची सुटी मिळेल.  
* शक्य असल्यास कंपनी महिलांना घरून काम करण्याची परवानगी देऊ शकतात.  
* प्रत्येक संस्थेस नियुक्तीपासून महिलांना या याेजनेचा लाभ देणे अावश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...