आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विम्याच्या पैशावरून नातवाकडून आजोबाचा खून; पालम तालुक्यातील चाटोरी येथील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- पीक विम्याच्या पैशावरून नातवाने आजोबा व काकास मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या आजोबाचा शुक्रवारी(दि.२१) उपचारादरम्यान नांदेड येथे मृत्यू झाला. नातवावर पालम पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 


चाटोरी येथे दि.१६ सप्टेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास पांडुरंग भोगाळे (८०) व त्यांचा मुलगा चंद्रकांत या दोघांशी नातू नवनाथ भोगाळे याचा पीक विम्याच्या पैशांवरून वाद झाला. नवनाथने आजोबा पांडुरंग व काका चंद्रकांत यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. गंभीर मार लागलेल्या पांडुरंग यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

 

बातम्या आणखी आहेत...