Home | Maharashtra | Mumbai | HDFC Bank vice-president murdered over Money Says Mumbai Police

HDFC बॅंक अधिकारी मर्डर केस; आरोपीचा कबूलनामा..35000 रुपयांच्या EMI भरण्यावरून केली हत्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 11, 2018, 08:46 AM IST

HDFC बॅंकेचे व्हाईस प्रेसिडेंट सिद्धार्थ संघवी हत्येचा गुंता सोडविल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला केला आहे.

  • HDFC Bank vice-president murdered over Money Says Mumbai Police

    मुंबई- HDFC बॅंकेचे व्हाईस प्रेसिडेंट सिद्धार्थ संघवी हत्येचा गुंता सोडविल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला केला आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी अटक केलेला आरोपी सरफराज शेख यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने पैशासाठी संघवी यांची हत्या केल्याचे सांगितले आहे.

    EMI भरण्यासाठी सरफराजला 30-35 हजार रुपयांची गरज होती. सिद्धार्थ संघवी यांची कार रस्त्यात अडवून त्यांना लुबाडणे, हा त्याचा एकमेव उद्देश होता. मात्र, ओळख समोर येईल या भीतीमुळे त्याने सिद्धार्थ संघवी यांना चाकूने भोसकून त्यांची निर्घृण हत्या केली. नंतर मृतदेह कल्याणच्या खाडी परिसरात फेकून दिल्याचे सरफराज याने पोलिसांना सांगितले.

    आरोपीला पोलिसांनी सोमवारी भोईवाडा कोर्टात हजर केले. कोर्टाने सरफराज याला 19 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, सिद्धार्थच्या नातेवाइकांनी पोलिसांच्या थेअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    सिद्धार्थच्या नातेवाईकांनी सांगितले की, चोरीचपाटी करणार्‍याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची गरज भासत नाही. जर सफरराज याला चोरीचपाटीच करायची होती तर सिद्धार्थच का? सरफराज हा फेब्रिकेशनचे काम करतो. विशेष म्हणजे तो सिद्धार्थचे ऑफिस असलेल्या बिल्डिंगमध्ये काम करत होता. कोणी कामावर जाताना चाकू घेऊन जात नाही. किंवा चोरीचपाटीसाठी कोणारी हत्या करत नाही.

    पोलिस खर्‍या आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात बॅंकेचे नाव खराब होत अाहे. सिद्धार्थच्या हत्येत बॅंकेतील लोकांचा सहभाग असल्याचा आरोपी नातेवाईकांनी केला आहे.

    दरम्यान, संघवींना मिळालेल्या पदोन्नतीमुळे जळफळाट झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यानेच सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कटात आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता आहे. संघवी यांची कार शनिवारी रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडली होती.

    संघवी कमला मिल शाखेत होते. बुधवारी सायंकाळी ते बँकेतून बाहेर पडल्याचे सीसीटीव्हीत दिसते. मात्र ते घरी पोहोचले नाहीत. दरम्यान, पोलिस कारमधील रक्ताचे नमुने संघवींच्या कुटुंबीयांशी जुळवून पाहत होते. तसेच त्यांचे कॉल रेकॉर्डही तपासण्यात येत आहेत.

    3 दिवसांपासून होते बेपत्ता रक्ताने माखलेली कार सापडली...
    > सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहत होते. ते बुधवारी रात्री ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरुन मलबार हिलकडे निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिले होते. मात्र, ते घरी पोहोचले नाही. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा फोन लावून चौकशी करण्‍याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन स्वीचऑफ येत होता.
    > यानंतर एन.एम.जोशी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास केला असता त्यांना शुक्रवारी संघवी यांची रक्ताने माखलेली कार सापडली होती. ही कार नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात आढळली. त्याचवेळी पोलिसांना संघवी यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

    पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

  • HDFC Bank vice-president murdered over Money Says Mumbai Police
    एचडीएफसी बॅंकेचे व्हाईस प्रेसिडेंट सिद्धार्थ संघवी (39)
  • HDFC Bank vice-president murdered over Money Says Mumbai Police
    शुक्रवारी संघवी यांची रक्ताने माखलेली कार सापडली होती. ही कार नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात आढळली.
  • HDFC Bank vice-president murdered over Money Says Mumbai Police
    संघवी कमला मिल शाखेत होते. बुधवारी सायंकाळी ते बँकेतून बाहेर पडल्याचे सीसीटीव्हीत दिसते.

Trending