आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंद्धश्रद्धेच्या आहारी गेली गरोदर आदिवासी महिला...महिलेसह बालकाला वाचविण्यासाठी आरोग्य विभागाला यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी- मेळघाटातील बेरदा बल्डा येथील एका गरोदर आदिवासी महिलेसह तिच्या बालकाला वाचविण्यासाठी तब्बल तीन दिवसानंतर आरोग्य विभागाच्या पथकाला यश आले आहे. काडमी हिरालाल सावळकर (वय-28) असे या महिलेची नाव असून ती बेरदा येथील राहाणारी आहे.

काडमी सावळकर या महिलेची नोद आरोग्य विभागासह अगंणवाडी केंद्रात करण्यात आली होती.

 

महिलेवर औषधोउपचार आणि शासणाकडून मिळणार्‍या योजनाचा लाभही या महिलेला देण्यात आला होता. मात्र, अचानक या महिलेसह संपूर्ण कुटूंब अंद्धश्रद्धेच्य आहारी गेले. तेव्हापासून ही महिला बेपत्ता होती. काडमी ही गाव सोडून जगंलातील शेतात लपून बसली होती. अगंणवाडी सेविका, आरोग्य परिचारीकांनी महिलेचा शोध घेतला. अखेर शनिवारी या महिलेला मेळघाटातील जंगलातून संततधार पावसात खाटेवर उचलून आणण्यात आले. जोरदार पावसामुळे मेळघाटातील नदी, नाल्यांना पूर आला होता.

 

पधंरा दिवसांपासून ही महिला आजारी होती. तिच्या अंगातील रक्त कमी झाले होते. ही बाब अगंणवाङी सेविका मीना वानखडे यांनी हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविली. आरोग्य केंद्राचे पथक बेरदा येथे पोहोचले. पण ही महिला आरोग्य केंद्रात दाखल होण्याकरीता प्रतिसाद देत नव्हती. अखेर मेलघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल, बेरदाचे सरपंच चंप्पालाल मावस्कर, गट विकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख यांनी मोठ्या परिश्रमाने काडमीला नदीतून खाटेवर गावात आणले. तिला तातडीने अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तिची प्रकृती आणखी खालवल्याने तिला नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. नागपूरात काडमी हिने एका गोंडस बालकाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीन सुखरुप असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो

 

बातम्या आणखी आहेत...