आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात काठमांडू जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, पायलटसह सात प्रवाशी बेपत्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू- नेपाळमधील गोरखा जिल्ह्यात काठमांडू जाणारे हेलिकॉप्टर शनिवारी सकाळी कोसळले. या अपघातात पायलटसह सात प्रवाशी बेपत्ता आहे.  त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टचे जनरल मॅनेजर एम राज कुमार छेत्री यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर अपघातातील बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्‍यात आले आहे.

 

शनिवारी सकाळी 7 वाजून 45 मिनिटांला 9 एन-एएलएस हेलिकॉप्टर संपर्क कक्षेच्या बाहेर गेले. स्थानिक मीडियानुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये एक जापानी पर्यटकासह पाच नेपाळी प्रवाशी होते. काठमांडूपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या धडिंग जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले.

 
5500 फूट उंचीवर हेलिकॉप्टरचे अवशेष
नेपाळच्या पोलिसांनी सांगितले की, हेलिकॉप्टर संपर्क कक्षेच्या बाहेर गेले तेव्हा ते बार नुवाकोट आणि धडिंग जिल्ह्याच्या बॉर्डरवर होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष सत्यवती भागात आढळल्याची माहिती नेपाळ सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीने दिली आहे. सत्यवती हे 5500 फूट उंचीवर आहे. तसेच या परिसरात घनदाट जंगल आहे. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, खराब हवामानामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी येत आहे.

बातम्या आणखी आहेत...