आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पुन्हा हेल्मेटसक्ती...1 जानेवारीपासून प्रभावी अंमलबजावणी; प्रत्येक चौकात होणार कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- हेल्मेट वापरासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही तसेच जनजागृती करूनही पुणे शहरात हेल्मेट वापराविषयी उदासीनता असल्याने अनेकांना अपघातात आपले जीव गमवावे लागले. मात्र, आता 1 जानेवारीपासून पुण्यात प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि वाहतूक विभागाच्या पाेलिस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी स्पष्ट केले आहे.

 

यापूर्वी अनेकदा पुण्यात हेल्मेट सक्तीची घोषणा झाली व त्यानंतर काही दिवस कारवाया झाल्या, मात्र हेल्मेटसक्तीला पुणेकरांनी आतापार्यंत केराची टोपली दाखवली आहे. रस्त्यावरील अपघात अनेकदा किरकोळ असतो. शरीरावरील जखमाही गंभीर नसतात. पण डोक्याला मार लागल्याने जीव जातो. पुण्यात सुमारे 27 लाख दुचाकी आहेत. हेल्मेट वापरण्याची संख्या तुरळक प्रमाणात आहे. हेल्मेट न घातल्याने एका चौकात दंडाची पावती फाडली म्हणजे परत दिवसभरात दुसरी कारवाई होणार नाही असा अनेकांचा समज असतो. मात्र, हेल्मेट न घालणाऱ्यांवर आता प्रत्येक चौकात कारवाई होणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...