आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवाच्या खर्चाला फाटा देत केरळ पूरग्रस्तांना मदत..नेकनूरच्या माँ साहेब मित्र मंडळाचा आदर्श उपक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेकनूर- बीड तालुक्यातील नेकनूर येथे दर वर्षी गणेशत्सव सामाजिक उपक्रमाने साजरा होत असतो. या वर्षी नेकनूरचे मॉं साहेब गणेश मंडळ या वर्षी आदर्श उपक्रम राबवत आहे. गणेशत्सवातील खर्चाला फाटा देत जमा होणारी रक्कम केरळ पूरग्रस्तांना मदत करणार असल्याने मॉं साहेब गणेश मंडळाच्या हया आदर्श उपक्रमामुळे मंडळाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

 

मॉं साहेब गणेश मंडळाचे हे सहावे वर्ष आसुन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे यांनी सुचवलेल्या कल्पनेला मंडळातील सर्वांनीच सहमती दर्शवल्याणे या वर्षी एक हात मदतीचा हात म्हणून माँ साहेब गणेश व मित्रमंडळाच्या वतीने गणेशमूर्तीची स्थापना न करता डेकोरेकशन व इतर खर्च न करता जी काही वर्गणी जमा होईल ती वर्गणी सर्वांनुमते केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली जाईल, असा निर्णय माँ साहेब मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. यावेळी गणेश  मंडळाचे स्वंस्थापक संतोष बजरंग शिंदे, कृष्णा शिंदे,  आचित शिंदे, दीपक शिंदे, गणेश शिंदे, प्रतिक कदम,  संदीप शिंदे , दिनेश गुरव, दादा मुळे, सचीन राऊत, शुभम काळे, स्वप्नील शिंदे, सुजित शिंदे, विकास गिराम, सुधीर शेडगे, कृष्णा शिंदे , अमोल मुळे ,वैभव शिंदे ,महेश पिसे, दत्ता तडस्कर ; आमोल मुळे,औदूंबर जरे,मुण्णा शिंदे,नितीन राऊत,सचीन राऊत आदी जन उपस्थित होते. मॉं साहेब मित्र व गणेश मंडळ हया वर्षी राबवत असलेल्या या आदर्श उपक्रमाला सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...