Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | High Profile sex racket busted In unisex saloon at Nagpur

नागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट..सलूनमध्ये येणार्‍या ग्राहकांना दाखविले जात होते शरीरसुखाचे आमिष

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 18, 2018, 02:23 PM IST

सुनील हा संगीताच्या मदतीने सलूनमध्ये येणार्‍या ग्राहकांना शरीरसुखाचे आमिष दाखवत होता.

  • High Profile sex racket busted In unisex saloon at Nagpur

    नागपूर- धावत्या कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटचा भंडाफोड करून पोलिसांनी दोन दलालांना अटक केल्याची घटना ताजी असताना नागपूर शहरात आणखी एक हॉय प्रोफाइल सेक्स रॅकेट उघड झाले आहे. मानेवाड्यातील तपस्या चौकाजवळीत इराई विहार येथील शाईन युनिसेक्स सलूनमध्ये पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

    युनिसेक्स सलूनमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी खातरजमा केली असता सलूनमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचे समजले. एक दलाल महिलांकडून देहविक्री करून घेत होता. पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला सलूनमध्ये पाठवून सापळा रचला. सुनील राजू वाहणे (रा. यादव नगर) याला पोलिसांनी अटक केली. मात्र, त्याची महिला साथीदार संगीता गोपीचंद गजभिये पळून जाण्यात यशस्वी झाली.

    सुनील हा संगीताच्या मदतीने सलूनमध्ये येणार्‍या ग्राहकांना शरीरसुखाचे आमिष दाखवत होता. ग्राहकाकडून यासाठी मोठी रक्कम वसूल केली जात होती. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trending