Home | Maharashtra | Pune | Husband murdered his wife at Pune Shirur

स्वयंपाक करण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली गळा आवळून हत्या; पोलिस स्टेशनला जाऊन केले सरेंडर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 14, 2018, 11:59 AM IST

शिरूर तालुक्यात क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली आहे.

  • Husband murdered his wife at Pune Shirur

    पुणे- शिरूर तालुक्यात क्षुल्लक कारणावरून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपी पतीने पोलिस स्टेशनला जाऊन स्वत:ला सरेंडर केले. लता साळुंके (32) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेचा भाऊ पांडुरंग श्याम कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी संदीपन प्रभाकर सोळुंके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा लताला संशय होता. त्यावरून दोघांमध्ये मागील काही महिन्यांपासून वाद सुरु होते. यावरून लता काही महिने माहेरी गेली होती.

    संदीपनने अशी केली पत्नीची हत्या...

    बुधवारी संदीपन ऑफिसला जाण्यास निघाला. त्याने पत्नीला स्वयंपाक करण्‍यास सांगितले. मात्र, तिने स्पष्ट नकार दिला. याचा राग आल्याने संदिपन याने लताचा ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. नंतर त्याने थेट पोलिस स्टेशन गाठले आणि स्वत:ला पोलिसांना सरेंडर केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Trending