आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची गळफास लावून आत्महत्या; पिंपरी चिंचवडमधील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नैराश्यातून जयने जीवन संपविले..

पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये पती-पत्नीच्या सुंदर नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सकाळी ही घटना समोर अली. या घटनेमुळे परिसरात  खळबळ उडाली आहे. जय तेलवाणी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी जय तेलवाणी यांची पत्नी तृप्ती जय तेलवाणी हिला ताब्यात घेतले आहे.

 

जय हा पत्नी, आई आणि मुलीसोबत चिखली परिसरात राहात होता. तृप्ती पतीचा छळ करायची, असा आरोप आई कांचन यांनी केला आहे. तृप्तीविरोधात चिखली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

नैराश्यातून जयने जीवन संपविले..

तृप्ती ही जय याचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होती. पतीला पैशासाठी मारणे, त्याला कॅन्सर झाला आहे असे त्याच्या मित्रांना खोटे सांगणे. या सगळ्याचा तिने एक व्हिडिओदेखील बनवला होता. तो व्हिडिओ तृप्ती जयच्या मित्रांना दाखावायची. याच सगळ्याच्या नैराश्यातून तेजने आपले जीवन संपविले. पोलिसांनी तृप्तीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आता तिची कसून चौकशी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...