आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक पत्नीला शाळेतच जाळण्याचा पतीकडून प्रयत्न; फॅमिली कोर्टात न आल्याने काढला राग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कौटुंबिक वादातून विभक्त राहणाऱ्या एका दाम्पत्याची पुणे कौटुंबिक न्यायालयात त्यांची घटस्फोटाची केस सुरु आहे. मात्र, सदर केसच्या सुनावणीस शिक्षक पत्नी अनुपस्थित राहिल्याच्या रागातून पतीने, पत्नीच्या शाळेत जाऊन तिच्यावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकून त्यानंतर काडीपेटीतील काडी पेटवून तिच्या अंगावर टाकून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी गंभीर जखमी झालेल्या शिक्षक पत्नीला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी संतोष नामदेव चव्हाण (वय-39) याला अटक केली आहे. या घटनेत त्याची पत्नी आशा संतोष चव्हाण ही जखमी झाली असून तिने पती विरोधात पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आशा चव्हाण या अपंग असून नऱ्हे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. संताष चव्हाण याला दारुचे व्यसन असल्याने तसेच कौटुंबिक कारणावरुन तो पत्नीशी सतत वाद घालत असल्याने दोघे मागील काही दिवसांपासून मुलांसह विभक्त राहत आहे. तसेच पतीपासून घटस्फोट मिळावा याकरिता त्यांनी न्यायालयात दावा ही दाखल केला आहे. शुक्रवारी न्यायालयात त्यांची केस होती. मात्र, आशा चव्हाण यांना कामामुळे केसकरिता जाणे शक्य झाले नाही. या गोष्टीचा पती संतोष याला राग येऊन तो पत्नीच्या शाळेत दुपारी तीन वाजण्याचे सुमारास गेला. त्यावेळी पत्नी आशा इतर शिक्षकांसोबत वर्गात जेवण करत असल्याने, त्यांना तुझ्यासोबत बोलावयाचे आहे असे सांगुन त्यांना वर्गाबाहेर बोलवण्यात आले. त्यानंतर दोघात कोर्टात न आल्यावरुन वाद होऊन संतोष याने त्याच्या सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर टाकून, काडेपेटीतील काडया काढून त्या पेटवून पत्नीच्या अंगावर टाकल्या. त्यामुळे पत्नी पेटली गेली व तिने आरडाओरडा सुरु केल्यावर आजूबाजूच्या लोकांनी जमा होत, आग विझवून तातडीने पीडित महिलेस रुग्णालयात दाखल केले. सदर शिक्षक महिलेची प्रकृती स्थिर असून तिला याप्रकारामुळे मानसिक धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...