आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hyderabad Telangana Honour Killing Father Created Drusyham Like Alibi To Dodge The Police

Telangana honour killing: फिल्म \'दृश्यम\'ने प्रेरित होऊन सासर्‍याने केली जावयाची निर्घृण हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- तेलंगणामधील नालगोंडामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी गेल्या आठवड्यात 23 वर्षीय दलित तरुणाची हत्या करण्‍यात आली होती. प्रणय असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो इंजिनिअर होता. मुलगी अमरुथा हिने दलित तरुणासोबत प्रेमविवाह केल्यामुळे नाराज वडिलांनी जावयाची हत्या करण्यासाठी एका टोळक्याला एक कोटी रुपयांची सुपारी दिली होती. या प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, या ऑनर किलिंगप्रकरणातील मुख्‍य आरोपी आणि प्रणयचा सासरा मूर्ती राव आहे. याने तेलुगू फिल्‍म 'दृश्‍यम'ने प्रेरित होऊन हे हत्याकांड घडवून आणले. विशेष म्हणजे त्याने पोलिसांची दिशाभूल करण्‍याचाही प्रयत्न केला. जावयाची हत्या झाली तेव्हा आरोपी सासरा घटनास्थळी उपस्थित नव्हता. एवढेच नाही तर या हत्‍याकांडात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे त्याने भासविण्याचाही प्रयत्न केला.

 

फिल्‍म 'दृश्‍यम'मध्ये अभिनेता व्यंकटेश याने मुलीवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी असाच प्रयत्न केला होता. नालगोंडाचे एसपी ए.व्ही. रंगनाथ यांनी सांगितले की, 'आरोपी मूर्ती राव याने 'दृश्‍यम' सिनेमाप्रमाणे स्वत:ला निर्दोष दाखविण्याचा प्रयत्न केला. 14 सप्टेंबरला प्रणयची हत्‍या झाली. हत्येच्या दोन तास आधी मूर्ती राव नालगोंडा येथील कलेक्‍टर ऑफिसमध्ये केला होता. अधिकार्‍यांना तो भेटला. हत्याकांडात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे मूर्ती राव याला दाखवून द्यायचे होते.'

 

अयशस्वी ठरला मूर्ती रावचा प्लान...
रंगनाथ यांनी सांग‍ितले की, 'मूर्ती राव हा नालगोंडा जाण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याला  डेप्‍युटी एसपी आणि आरडीओ यांना पाहिले. मूर्तीने आपली गाडी थांबवून त्याने पोलिस अधिकार्‍यांसोबत गणेश महोत्‍सवाबाबत चर्चा केली. यासर्व प्रकाराचा दाखला देत मूर्तीने या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला. परंतु मूर्तीचा हा दावा न‍िरर्थक ठरला. ऑनर किलिंगमध्ये मूर्ती राव यानेच घडवून अाणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.'

 

पोलिसांनी सांगितले की, मूर्ती राव याने या हत्याकांड प्रकरणी प्रचंड गोपनियता पाळली होती. त्याने पत्नीलाही याबाबत काहीही सांगितले नव्हते. मात्र, त्यांने या कामात पत्‍नीचा वापर केला होता. प्रणय आणि अमरुथा हिच्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी तो पत्नीला फोन करण्यास सांगत होता. अमरुथा गरोदर असल्याची माहितीही त्याला पत्नीकडूनच मिळाली होती. शनिवारी (14 सप्टेंबर) अमरुथा ही प्रणयसोबत हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जाणार होती, हे मूर्तीला 13 सप्टेंबरला पत्नीनेच सांगितले होते. परंतु मूर्तीच्या डोक्यात काय शिजत आहे, याबाबत तिला कल्पना नव्हती.

 

एक कोटी रुपयांत दिली सुपारी
प्रणय आणि अमरुथा हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी जाणार असल्याची माहिती मूर्ती राव याने अब्‍दुल बारी याला दिली. बारी याने याबाबत असगर अली आणि  असगरने सुभाष शर्मा याला सूचना दिली. प्रणयची हत्या करण्‍यासाठी मूर्ती राव याने आरोपींना एक कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते.

 

अमरुथा हिने पतीच्या हत्येप्रकरणी वडील आणि काका श्रवण राव यांना जबाबदार ठरविले आहे. मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे मूर्ती राव हे नाराज होते. त्यांनी जावयाच्या हत्येचा कट रचला होता. एक कोटी रुपयांत जावयाच्या हत्येची सुपारी दिली होती. आरोपींना 15 लाख रुपये अॅडव्हॉन्सही दिला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात पेरुमल प्रणय कुमार आपल्या गरोदर पत्नी अमरुथा हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. तितक्यात हल्लेखोर पाठीमागून येतो आणि प्रणयवर धारदार शस्त्राने हत्या करतो.

बातम्या आणखी आहेत...