मनसचे परप्रांतीयांविरोधातील आंदोलन..राज / मनसचे परप्रांतीयांविरोधातील आंदोलन..राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टाकडून जामीन मंजूर

दिव्य मराठी वेब टीम

Dec 18,2018 04:49:00 PM IST

नाशिक- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 2008 मध्ये परप्रांतीयांविरोधातील केलेल्या आंदोलन प्रकरणी राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टाने मंगळवारी जामीन मंजूर केला. यावेळी कोर्ट परिसरात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. रेल्वे भरती परीक्षेदरम्यान 21 ऑक्टोबर 2008 रोजी मनसेने आंदोलन केले होते.

मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील साईप्लाझा या हॉटेलवर दगडफेक केली होती. राज ठाकरे यांनी चिथावणी दिल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण आल्याचा आरोप होता. या प्रकरणी राज यांच्यासह सहा मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अखेर राज ठाकरे कोर्टात झाले हजर..
इगतपुरी कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. राज ठाकरे यांना वारंवार समन्स बजावूनही ते कोर्टात हजर झाले नव्हते. मात्र, राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते मंगळवारी इगतपुरी कोर्टात सुनावणीला हजर झाले. न्यायदंडाधिकारी के.आय. खान यांनी राज ठाकरेंना जामीन मंजूर केला.

X
COMMENT