आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य कर्मचार्‍यांना सरकारकडून दसरा भेट...महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का देत महागाई भत्त्यात सुधारणा केली आहे. यानुसार राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्यात आले आहे. हा भत्ता आता 139 वरून 142 टक्के करण्यात आला आहे.


महागाई भत्त्यांमधील ही वाढ 1 जानेवारी 2018 पासून लागू होणार असून 1 ऑक्टोबर 2018 पासून या भत्त्याची वाढ रोखीने देण्यात येणार आहे. 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर, 2018 या 9 महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...