आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीना बोरा मर्डर केस.. इंद्राणी मुखर्जीची प्रकृती बिघाडली; जे.जे हॉस्पिटलमध्ये केले अॅडमिट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शीना बोरा मर्डर केसमधील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला जे.जे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्‍यात आले आहे. इंद्राणीची प्रकृती बिघडल्याने तिला सोमवारी भायखळा तुरुंगातून हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.


अनेक अाजारींनी इंद्राणीला ग्रासले....
हॉस्पिटलच्या सुत्रांनुसार, इंद्राणीला सोमवारी सांयकाळी 7 वाजून 20 मिनिटांला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. डोके दुखी, अांधारी येणे, अस्वस्थ वाटणे अशा विविध आजारांनी इंद्राणी त्रस्त आहे. इंद्राणीला आधीपासूनच उच्च रक्तदाब आहे.

 

आयएनएक्स मीडिया प्रकरणात इंद्राणी प्रमुख साक्षीदार..
शीना बोरा हत्याचा आरोप असलेली इंद्राणी मुखर्जी ही कार्ति चिंदमबरम् विरोधात आयएनएक्स मीडियाप्रकरणी सीबीआयची प्रमुख साक्षीदार आहे. काही दिवसांपूर्वी कार्ति आणि इंद्राणीला समोरासमोर बसवून सीबीआयने चौकशी केली होती.

बातम्या आणखी आहेत...