आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीना बोरा मर्डर केस...पीटर आणि इंद्राणी मुखर्जी होणार विभक्त; घटस्फोटासाठी केला अर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी हे लवकरच विभक्त होणार आहेत. वांद्र्ये येथील कोर्टात दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. सध्या दोन्ही तुरुंगात कैद आहेत. विभक्त होण्यास दोघांची सहमती आहे. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांचा विवाह नोव्हेंबर 2002 मध्ये झाली होती.

 

इंद्राणीच्या वकीलांनी कोर्टात सांगितले की, पीटरने इंद्राणीला घटस्फोट देण्यास तयारी दर्शविली आहे. कोर्टात ते स्वत: अर्ज करणार आहेत. 'मी अजूनही हँडसम दिसतो. नवे आयुष्य सुरु करायचे आहे'. असे पीटर मुखर्जी यांनी म्हटले आहे.

 

इंद्राणीला मृत्यूपत्रात करायचा आहे बदल...
सेशन कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान इंद्राणीचे वकील म्हणाले की, इंद्राणी आणि पीटरची विभक्त होण्याची इच्छा आहे. यासाठी इंद्राणीला‍ तिच्या मृत्यूपत्रात बदल करायचा आहे. 

 

कॅंडल आणि लॅम्प्स परत घेणार...
इंद्राणीने पीटरला 13 ऑगस्टला एक पत्र पाठविले होते. त्यात तिने काही साहित्यांची यादीही पाठविली होती. यात कॅंडल, बेडसाइड लॅम्प्स, फर्निचर, ज्वेलरी, धार्मिक वस्तूंसोबत आर्टवर्क आणि तिजोरीच्या चाव्यांचा समावेश आहे.

 

पीटर मुखर्जीला दोन मुले..

पीटर मुखर्जीला पहिल्या पत्नीचे दोन मुले आहेत. इंद्राणीला पहिल्या पतीपासून एक मुलगी (शीना) आणि एक मुलगा (मिखाइल) आहे.  शीना बोरा हिची 2012 मध्ये हत्या करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...