आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Inspiration Story Of Rich Person And Beggar In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनेकवेळा आपण विचार न करता हातामध्ये आलेली मोठी संधी अशीच सोडून देतो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक अंध भिकारी दररोज रस्त्याच्या कडेला उभे राहून भीक मागत होता. जे काही पैसे मिळायचे त्यामधूनच उदरनिर्वाह करत होता. या जगात त्याचे कोणीही नव्हते. एके दिवशी त्या रस्त्यावरून खूप श्रीमंत शेठजी चालले होते. त्यांची दृष्टी त्या अंध भिकाऱ्याकडे गेली.


त्याची परिस्थिती पाहून शेठजीला दया आली आणि त्यांनी आपल्या खिशातून 100 रुपयांची नोट काढून भिकाऱ्याच्या हातावर ठेवली. त्यानंतर शेठजी निघून गेले. अंध भिकारीने नोटेला स्पर्श करून पाहिले तर त्याला वाटले की, कोणीतरी त्याच्या हातावर नोटेएवजी कागदाचा एक तुकडा ठेवून गेले आहे. कारण यापूर्वी भिकाऱ्याला कोणीही शंभर रुपयांची नोट दिलेली नव्हती. 


100 रुपयांची नोट आकाराने मोठी असल्यामुळे भिकाऱ्याला ती कागदाचा तुकडा वाटली आणि त्याने नोट फेकून दिली. जवळच उभा असलेला तो व्यक्ती हे सर्वकाही पाहात होता. भिकाऱ्याने पैसे फेकून देण्यामागेचे कारण त्याने भिकाऱ्याला विचारले.


तेव्हा भिकाऱ्याला समजले की, त्याने फेकून दिलेला कागदाचा तुकडा नाही तर 100 रुपयांची नोट होती. या पैशांनी भिकाऱ्याच्या अनेक गरजा पूर्ण झाल्या असत्या. 


लाईफ मॅनेजमेंट 
अनेकवेळा आपण हातामध्ये आलेली संधी ओळखू शकत नाहीत आणि ती सोडून देतो. परंतु जेव्हा आपल्याला त्या संधीविषयी समजते तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि आपण दुःखी होतो. यामुळे विचार न करता आयुष्यात पुढे जाण्याची आलेली कोणतीही संधी सोडू नये.