आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीनदयाळ उपाध्याय योजना..पतसंस्थांतील एक लाखापर्यंतच्या ठेवींना मंगळवारपासून संरक्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात नागरी, ग्रामीण बिगर शेती, महिला व पगारदार सहकारी पतसंस्था तसेच मल्टिस्टेट पतसंस्थांतील एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देणारी पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजनेचा प्रारंभ 25 सप्टेंबरला लोणावळा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी सांगितले. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

 

‘राज्यात सहकारी पतसंस्थांचे मोठ्या प्रमाणात जाळे असून, आर्थिक विकासात पतसंस्थांचे मोठे योगदान आहे. सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळावे, ही अनेक वर्षांपासून पतसंस्थांकडून मागणी होती. त्यामुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय पतसंस्था ठेव संरक्षण योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेमुळे राज्यातील 8 हजार 421 पतसंस्थांच्या 40 हजार कोटी रुपयांच्या ठेवींना  संरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य पतसंस्था महासंघ अशा दोन्ही संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देण्यात येणार आहे. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महामंडळाकडे 26 सप्टेंबरपासून अर्ज सादर करता येईल, असे  देशमुख यांनी सांगितले.  या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...