Home | Health And Lifestyle | Yoga Day | intimate sex kiss and touch may causes for STD disease Sex Tips in Marathi

फक्त सेक्स केल्यानेच नाही तर kiss केल्यानेही होतात हे गंभीर आजार.. आजच व्हा सावध!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 16, 2018, 12:01 AM IST

तुम्ही न्यूड होऊन पार्टनरसोबत इंटीमेट होत असला तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता जास्त आहे.

 • intimate sex kiss and touch may causes for STD disease Sex Tips in Marathi

  अनसेफ सेक्स केल्याने प्राणघातक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु कदाचित तुम्हाला माहीत नसेल की, बहुतांश आजार हे सेक्स न करताही होऊ शकतात. पार्टनरला फक्त किस किंवा टच केले तर आपल्याला काहीच होणार, असा तुमचा समज असेल तर हीच ती योग्य वेळ आहे, सावध व्हा.

  इंटिमेट टच केल्याने होतात हे आजार..
  असुरक्षित सेक्स केल्याने अत्यंत गंभीर गुप्तरोग होण्याची शक्यता जास्त असते. वेळप्रसंगी आपल्या जिवावरही बेतू शकते. केवळ सेक्स केल्यानेच नाही तर किस करणे ‍किंवा इंटिमेट टच केल्यानेही आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात.

  बहुतांश कपल सेक्स करण्यापासून स्वत:ला लांब ठेवतात. परंतु ते इंटिमेट होण्यापासून ते एकमेकांना रोकू शकत नाही. किस, टच किंवा ओरल एक्टिव्हिटीज केल्याने दुर्धर आजार होण्याची शक्यता जास्त असते. आयुष्यभर असे आजार बरे होत नाहीत.

  क्लेमाडिया एक सेक्सुअली ट्रान्समिटेड डिजिझ..
  क्लेमाडिया हा आजार किस करणे, टच करणे किंवा इतर ओरल एक्टिव्हिटीने होतो. या आजाराला सेक्सुअली ट्रान्समिटेड डिजिझही म्हटले जाते. हे एक प्रकारचे इंफेक्शन असते. पार्टनरच्या जिनिटाइलला ओरली टच केल्याने प्रामुख्याने या आजाराची लागण होते. महिला पार्टनर या आजारात जास्त त्रस्त असतात. यूटरेसमध्ये इंफेक्शन परते. भविष्यात त्यांना प्रेग्नेंसीतही अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. इंफेक्शनमुळे महिलांच्या ट्यूब्स ब्लॉक होण्याचा धोका असतो.

  हरपीझ
  हरपीझ हे एक कॉमन सेक्सुअल डिसिझ आहे. ओरल सेक्सच्या माध्यमातून हा आजार पसरतो. तुम्ही कायम ओरल सेक्स करत असाल तर आजच सावध व्हा. हरपीझ होण्याची शक्यता जास्त असते. हरपीझ हा स्किनशी संबंधित आजार आहे.

  एचपीव्ही
  एचपीव्ही हा देखील एक प्रकारचा स्किन ‍डिसिज आहे. तो ओरल सेक्समुळे होत असतो. संपूर्ण शरीरावर वेदनादायी पूरळ उठतात.

  मोलोस्कम कन्टेजियोसम
  मोलोस्कम कन्टेजियोसम हा एक प्रकारचा त्वचा रोग आहे. तुम्ही न्यूड होऊन पार्टनरसोबत इंटीमेट होत असला तर तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता जास्त आहे. संपूर्ण शरीरात गाठी तयार होतात. सोबतच खाज, खरूजही होते.

Trending