आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- जिल्ह्यातील अचलपूर येथे पेट्रोलिंगदरम्यान मंळवारी पहाटे पेट्रोलिंगदरम्यान सहायक पोलिस उपनिरीक्षक शांतीलाल पटेल यांची काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चार ते पाच गुंडांनी पटेल यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. पटेल यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पोलिस स्टेशनपासून जवळच ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
असे आहे हे प्रकरण...
पीएसआय शुभांगी ठाकरे यांनी या सात ते आठ आरोपींना भर रस्त्यावर दारूचे सेवन करताना पाहिले. त्यांना हटकले असता ते पळून गेले. मात्र, काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींना पोलिसांनी मारहाणही केली. याचा राग मनात ठेवून आरोपींनी शुभांगी ठाकरे यांचा पाठलाग केला. मात्र, त्या कुठेही सापडल्या नाहीत. पहाटे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शांतीलाल चुणीलाल पटेल (वय 52) हे पहाटे पेट्रोलिंगसाठी निघाले असता चार-पाच गुंडांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात पटेल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पुढील आरोपींचा शोध सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.