आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीतील या नयनरम्य ठिकाणी होणार ईशा अंबानीचा साखरपुडा, 3 दिवस चालणार जल्लोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीचा साखरपुडा आज (21 सप्टेंबर) रोजी आनंद पीरामल सोबत होणार आहे. ईशा आणि आनंदचा साखरपुडा इटलीतील नयनरम्य ठिकाणी होईल. या ठिकाणाचे नाव लेक कोमो आहे. रविवारपर्यंत ईशा अंबानी आणि आनंद पिरामलच्या साखरपुड्याचे कार्यक्रम सुरु राहणार आहेत. आकाश अंबानीचे लग्न अगोदर होईल असे पहिले मानले जात होते. परंतू ईशाचे लग्न अगोदर होणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये तिचे लग्न होणार असल्याच्या चर्चा आहेत. 


तीन दिवस चालणार एंगेजमेंट प्रोग्राम 
ईशा अंबानी आणि आनंद पीरामलच्या साखरपुड्याचे फंक्शन शुक्रवारपासून रविवारपर्यंत चालणार आहेत. हे सर्व कार्यक्रम इटलीच्या लेक कोमो जवळ होतील. त्यांचा एंगेजमेंट प्रोग्राम रविवारी फेयरवेल लंचसोबत समाप्त होईल. 

 

येथे होणार एंगेजमेंट 
लेक कोमोमध्ये ग्रांड लग्जरी हॉटेल विला दऐस्टे हॉटेल आहे. येथे तीन दिवस एंगेजमेंट पार्टी सुरु राहणार आहे. हे ठिकाण हॉलिवूड सेलिब्रिटीजमध्ये खुप प्रसिध्द आहे. या ठिकाणी हॉलिवूड स्टार जॉर्ज क्लूनीचा बंगला आहे. येथे विकेंडपर्यंत ईशा आणि आनंदच्या साखरपुड्याचे अनेक कार्यक्रम होणार आहेत. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर...

 

बातम्या आणखी आहेत...