Home | News | isha ambani and anand piramal prewedding photo and Video

ईशा आणि आनंद यांची प्री वेडिंग सेरेमनी सुरु...समोर आला पहिला व्हिडिओ, सलमान, अमिरसह उदयपुरात पोहोचले हे बॉलिवूड सेलेब्स..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 10, 2018, 12:47 PM IST

अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांचेही उदरपूरमध्ये आगमण झाले आहे. मुकेश आणि नीता यांनी केले स्वागत..

 • एंटरटेनमेंट डेस्क - रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांच्या प्री-वेडिंग सेरेमनी सुरु झाली आहे. सायंकाळी 5 वाजता महाआरतीनंतर संगीत सेरेमनी सुरु झाली आहे. सेरेमनीसाठी बॉलिवूड सेलेब्सनी हजेरी लावली आहे. एवढेच नाही तर देश-विदेशातील प्रमुख पाहुणे देखील उदयपूरमध्ये पोहोचले आहेत. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांचेही उदरपूरमध्ये आगमण झाले आहे.

  ईशा आणि आनंद यांच्या प्री- वेडींग सेरेमनीसाठी सलमान खान, कटरीना कैफ, जान्हवी कपूर, अनिल कपूर, अमिर खान, करण जोहर, जॅकलिन, आलिया भट्ट, परिनिती चौप्रा आदी सेलेब्स पोहोचले आहेत.

  दुसरीकडे, ऐश्वर्या राय ही पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या हिच्यासोबत उदयपूरमध्ये पोहोचली आहे. त्यांच्यासोबत जया बच्चनही आहे.

  सेलेब्स करणार रॅम्पवॉक..
  सेरेमनीमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा पाहुण्यांकडून रॅम्पवॉक करून देणार आहे. दुसरीकडे प्लेबॅक सिंगर अरिजीत सिंह आपल्या सुपर हिट गीतांना पाहुण्यांचे मनोरंजन करणार आहे. हॉलीवूड सिंगर बेयांसे नोल्स आणि प्रियांका चोप्रा देखील परफॉर्म करण्याची शक्यता आहे.

  रिपोर्ट्सनुसार, म्युझिक डायरेक्टर एआर रहेमान हा देखील स्टेजवर उपस्थित राहाणार आहे. संगीत सेरेमनीला करण जोहर होस्ट करणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान ईशा आणि आनंद परिमल यांचा डान्सही पाहुण्यांना पाहायला मिळणार आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... ईशा आणि आनंद पीरामल यांच्या प्री वेडिंग सेरेमनीचा पहिला व्हिडिओ..

 • isha ambani and anand piramal prewedding photo and Video
  जान्हवी कपूर
 • isha ambani and anand piramal prewedding photo and Video
  हिरली क्लिंटन यांचे स्वागत करताना मुकेश आणि नीता अंबानी
 • isha ambani and anand piramal prewedding photo and Video
  अमिर खान आणि किरण राव
 • isha ambani and anand piramal prewedding photo and Video
  सलमान खान
 • isha ambani and anand piramal prewedding photo and Video
  करण जोहर
 • isha ambani and anand piramal prewedding photo and Video
  जान्हवी कपूर
 • isha ambani and anand piramal prewedding photo and Video
 • isha ambani and anand piramal prewedding photo and Video

Trending