आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Ramban Martyred Soldiers Wife Delivers Baby Girl Hours Before His Cremation

अंत्यसंस्कारांच्या काही तास आधी शहिदाच्या मुलीचा जन्म, 10 वर्षांपासून अपत्यप्राप्तीची आस, नवजात मुलीला सोबत दर्शनास आली पत्नी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनिहाल / जम्मू-  जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात शहीद रणजितसिंह यांच्यावर अंत्यसंस्कारांची तयारी सुरू होती. त्याच वेळी शहिदाची पत्नी शिमूदेवी रुग्णालयात प्रसूत झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. रणजित व शिमू यांना अपत्यप्राप्तीसाठी दहा वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. मुलीच्या जन्मानंतरच शहिदाला अंतिम निरोप द्यावा, असे नियतीलाही कदाचित मंजूर असावे. यासाठी अंत्यसंस्कारास थोडा उशीर लागला.

 

राजोरी येथील सुंदरबनी सेक्टरमध्ये लान्स नायक रणजितसिंह (36) रविवारी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. तिरंगा ध्वजात गुंडाळलेले त्यांचे पार्थिव सोमवारी त्यांचे गाव सुलीगाम येथे आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांना अखनूर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काही कारणास्तव रणजित यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास उशीर झाला. तेव्हा कुटुंबीयांनी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री शिमूला प्रसूतिवेदना होण्यास सुरुवात झाली. तिला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तिने मंगळवारी पहाटे 5 च्या सुमारास एका गोंडस मुलीला जन्म दिला.

 

#JammuAndKashmir: A day after soldier Ranjit Singh Bhutyal lost his life in an attack by Pakistan intruders, his wife Shimpu Devi gave birth to a baby girl in Ramban. She says "I wish my daughter too joins the Indian army and serves the nation like her father." pic.twitter.com/uHKjP63zJ4

— ANI (@ANI) October 23, 2018

 

नवजात मुलीला घेऊन अंत्यसंस्कारस्थळी आली शिमू
शिमूला रुग्णवाहिकेतून नवजात मुलीसह पतीच्या अंत्यसंस्कारस्थळी चंबा सेरी येथे आणले. पत्नी व मुलीने शहिदास अंतिम निरोप दिला. रणजित जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्रीमध्ये तैनात होते. ते 2003 मध्ये लष्करात भरती झाले होतेे.

 

पत्नीच्या देखभालीसाठी सुटी घेणार होते रणजित
शहिदांचे निकटवर्तीय विजयकुमार यांनी सांगितले, पत्नीची देखभाल करण्यासाठी रणजित सुटी घेणार होता. विजय म्हणाले, रणजित शहीद झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. परंतु मुलीच्या जन्मानंतर हे कुटुंब पुन्हा यातून सावरेल.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...