Home | Jeevan Mantra | Dharm | Janmashtami 2018 Chief Temple Of Sri Krishna

अनोख्या आहेत श्रीकृष्णाच्या या 7 मूर्ती, काही जमिनीतून तर काही नदीमधून मिळाल्या

रिलिजन डेस्क | Update - Sep 03, 2018, 02:49 PM IST

धर्म ग्रंथानुसार श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

 • Janmashtami 2018 Chief Temple Of Sri Krishna

  धर्म ग्रंथानुसार श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी हा सण 2 आणि 3 सप्टेंबरला आहे. वृंदावन येथे भगवान श्रीकृष्णाने बाल रूपात अनेक लीला आणि राक्षसांचा वध केला. येथे श्रीकृष्णाचे विश्वप्रसिद्ध मंदिर आजही आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 7 चमत्कारी श्रीकृष्ण मूर्तींची माहिती देत आहोत. या मूर्तींचा संबंध वृंदावनशी आहे. यामधील 3 मूर्ती आजही वृंदावनात आहेत तर 4 इतर ठिकाणी स्थापित आहेत...


  1.गोविंददेवजी
  रूप गोस्वामी यांना श्रीकृष्णाची ही मूर्ती वृंदावनातील गौमा टीला नामक ठिकाणी इ.स.1592 (सन् 1535) मध्ये आढळून आली. त्यांनी याच ठिकाणी एक छोटीशी झोपडी बांधून मूर्तीची स्थापना केली. त्यानंतर रघुनाथ भट्ट गोस्वामी यांनी गोविंददेवजी यांची पूजा केली. त्यावेळचे आमेर नरेश मानसिंह यांनी गोविंदजीचे भव्य मंदिर बांधले. या मंदिरात गोविंदजी 80 वर्ष विराजित होते परंतु औरंगजेब शासन काळात युद्धामुळे भक्तांनी गोविंददेव मूर्ती जयूपरला नेली. तेव्हापासून गोविंददेव जयपूरच्या राजकीय (महाल० मंदिरात विराजमान आहेत.


  2. मदन मोहनजी
  ही मूर्ती अद्वैतप्रभु यांना वृंदावनमध्ये कालीदहजवळ द्वादशादित्य टेकडीवर आढळून आली. त्यांनी सेवा-पूजेसाठी मूर्ती मथुरेच्या चतुर्वेदी कुटुंबाकडे दिली आणि चतुर्वेदी कुटुंबाकडून सनातन गोस्वामी यांनी इ. स.1590 (सन् 1533) मध्ये पुन्हा वृंदावनातील त्याच टेकडीवर स्थापित केले. त्यानंतर क्रमशः मुलतानचे मिठाचे व्यापारी रामदास कपूर आणि ओडिशाचे राजा यांनी येथे एक मोठे मंदिर बांधले. मुघल आक्रमणानंतर भक्त मदन मोहनजी यांची मूर्ती घेऊन जयपूरला गेले. काही काळाने करौलीचे राजा गोपालसिंह यांनी आपल्या महालाजवळ मोठे मंदिर बांधून या मूर्तीची स्थापना केली. तेव्हापासून ही मूर्ती येथेच आहे.


  3. गोपीनाथजी
  श्रीकृष्णाची ही मूर्थी संत परमानंद भट्ट यांना यमुना नदीच्या काठावर वंशीवट येथे आढळून आली. त्यानंतर या मूर्तीची स्थापना निधीवनजवळ करण्यात आली आणि मधू गोस्वामी या मूर्तीची पूजा करू लागले. त्यानंतर रायसाल राजपुतांनी येथे मंदिर बांधले परंतु औरंगजेब आक्रमण काळात ही मूर्तीही जयपूरला नेण्यात आली. तेव्हापासून गोपीनाथजी येथे विराजमान आहेत.


  4. जुगलकिशोरजी
  भगवान श्रीकृष्णाची ही मूर्ती हरिरामजी व्यास यांना इ.स. 1620 मध्ये माघ शुक्ल एकादशीला वृंदावनच्या किशोरवन येथे आढळून आली. येथेच या मूर्तीची स्थापना करण्यात आली. काही काळाने ओरछाचे राजा मधुकर शाह यांनी किशोरवनजवळ एक मंदिर बांधले. येथे भगवान जुगलकिशोर अनेक वर्ष विराजमान होते परंतु मुघल आक्रमणानंतर भक्त ही मूर्ती ओरछाजवळ पन्ना येथे घेऊन गेले. पन्ना (मध्य प्रदेश) येथे आजही जुगलकिशोर मंदिरात विराजमान आहेत.


  5. राधारमणजी
  गोपाळ भट्ट गोस्वामी यांनी गंडक नदीमध्ये एक शाळीग्राम मिळाला. त्यांनी तो शाळीग्राम वृंदावनात आणून किशोरघाटजवळ एका मंदिरात स्थापित केला. एक दिवशी एका व्यक्तीने चंदन लावलेल्या शाळीग्रामकडे पाहून कढीत वांगे पडल्यासारखे दिसत असल्याची टीका केली. हे एकूण गोस्वामी अत्यंत दुःखी झाले परंतु सकाळ होताच शाळीग्राममधून राधारमणची दिव्य मूर्ती प्रकट झाली.


  6. राधाबल्लभजी
  भगवान श्रीकृष्णाची ही सुंदर मूर्ती हरिवंश यांना हुंड्यात मिळाली होती. त्यांचे लग्न देवबंद येथून वृंदावनला येताना चटथावल गावात आत्मदेव ब्राह्मणाच्या मुलीशी झाले होते. पहिले वृंदावनच्या सेवाकुंज येथे (संवत् 1599) आणि नंतर सुंदरलाल भटनागर (काही लोक रहीम यांना श्रेय देतात) यांनी बनवलेल्या लाल दगडाच्या जुन्या मंदिरात राधावल्लभ मूर्ती स्थापित केली. मुघल आक्रमणाच्या वेळी भक्त ही मूर्ती घेऊन कामा (राजस्थान) येथे गेले. इ. स. 1842 मध्ये पुन्हा एकदा भक्त ही मूर्ती वृंदावनात घेऊन आले आणि येथे नवनिर्मित मंदिरात प्रतिष्ठापना केली.


  7. बांकेबिहारी
  मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला स्वामी हरिदास यांच्या उपासनेला साकार दूर देण्यासाठी बांकेबिहारी यांची मूर्ती निधीवानात प्रकट झाली. वृंदावनच्या भरतपुर बागेमध्ये इ.स. 1924 मध्ये मंदिर बांधल्यानंतर ही मूर्ती येथे स्थापित करण्यात आली. तेव्हापासून येथेच आहे.

 • Janmashtami 2018 Chief Temple Of Sri Krishna
 • Janmashtami 2018 Chief Temple Of Sri Krishna
 • Janmashtami 2018 Chief Temple Of Sri Krishna
 • Janmashtami 2018 Chief Temple Of Sri Krishna
 • Janmashtami 2018 Chief Temple Of Sri Krishna
 • Janmashtami 2018 Chief Temple Of Sri Krishna

Trending