आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाजवळ आहेत 14 कोटींच्या लग्झरी गाड्या, एकाची कारची किंमत तर आहे 3 कोटी, परिधान केल्या दीड कोटींच्या साड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री करीना कपूर 21 सप्टेंबर रोजी 38 वर्षांची झाली आहे. 2000 मध्ये 'रिफ्यूजी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणा-या करीनाने 2012 मध्ये अभिनेता सैफसोबत लग्न थाटले. करीनाच्या संपत्तीविषयी बोलायचे झाल्यास, नेटवर्दियरनुसार, ती 10 मिलियन डॉलर अर्थातच 72 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे. याशिवाय करीनाला लग्झरी गाज्यांचीही आवड आहे.  तिच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी, मर्सिडीज, BMW, रेंज रोवर आणि लेक्सस या आलिशान गाड्यांचा समावेश आहे. तिच्याजवळ सुमारे 14 कोटी रुपये किंमतीच्या या आलिशान गाड्या आहेत.

 

करीना एका चित्रपटासाठी 7 ते 10 कोटी रुपये मानधन घेते. 2010 मध्ये करीनाने स्वतःसाठी 7 कॅरेटची हि-याची अंगठी घेतली होती, त्याची किंमत तब्बल 72 लाख रुपये होती. एका मुलाखतीत करीनाने खुलासा केला होता की, एका एस्ट्रोलॉजरच्या सांगण्यावरुन तिने हीरा बोटात घातला आहे. 2012 मध्येही सैफने करीनाला 5 कॅरेटची हि-याची अंगठी गिफ्ट केली होती.


करीनाने परिधान केल्या होत्या दीड कोटींच्या साड्या..
'हीरोइन' (2012) या चित्रपटात करीना कपूरने 130 डिझायनर कपडे परिधान केले होते. हे सर्व कपडे मनीष मल्होत्राने डिझाइन केले होते. तिने परिधान केलेल्या डिझायनर साड्यांची किंमत दीड कोटी रुपये होती. चित्रपटासाठी करीनाने सहावर्षांपूर्वी 80 लाख रुपये चार्ज केले होते. चित्रपटाचा दिग्दर्शक मधूर भंडारकरने ट्वीट करुन सांगितले होते, 2001 मध्ये मी 'चांदनी बार' हा चित्रपट बनवला होता, त्याचा एकुण निर्मिती खर्च 1.5 कोटी होता, पण आता 'हीरोइन' या चित्रपटात करीनाचे कपडेच तेवढ्या किंमतीचे आहेत.

 

बूट्स आणि हॅण्डबॅग्सची शौकीन आहे करीना...

करीना विविध प्रकारच्या बूट्सची आवड आहे. तिच्या कलेक्शनमध्ये 100 हून अधिक बुट्स आहेत. करीनाला हॅण्डबॅग्सचीही विशेष आवड आहे. तिच्या बॅग्सचे आवडते ब्रॅण्ड्स Jimmy Choo, Camio Clutch, Tod's d Bag हे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...