भाजप, अामदारकी साेडून / भाजप, अामदारकी साेडून अाशिष देशमुख काँग्रेसकडे, राहुल गांधींसोबत पदयात्रेत सहभागी

खासदार नाना पटोले यांच्यापाठोपाठ विदर्भातील काटाेलचे आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी वर्ध्यातील काँग्रेसच्या कार्यसमितीचा मुहूर्त साधून भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला. देशमुख यांनी ई-मेल व फॅक्सने राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला. बुधवारी ते प्रत्यक्ष भेटून सादर करणार अाहेत.

प्रतिनिधी

Oct 03,2018 07:51:00 AM IST

नागपूर- खासदार नाना पटोले यांच्यापाठोपाठ विदर्भातील काटाेलचे आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी वर्ध्यातील काँग्रेसच्या कार्यसमितीचा मुहूर्त साधून भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला. देशमुख यांनी ई-मेल व फॅक्सने राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला. बुधवारी ते प्रत्यक्ष भेटून सादर करणार अाहेत.

दरम्यान, राजीनामा देताच देशमुख यांनी थेट वर्धा गाठून राहुल गांधी यांच्यासमवेत काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावत अागामी राजकीय प्रवासाचे संकेतही दिले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे अाशिष हे पुत्र अाहेत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अामदारकी मिळवली हाेती.

X
COMMENT