आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक शौचालयातून लवकर बाहेर न आल्याने वृद्धाची हत्या; आरोपीला ठोकल्या बेड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील वडाळा येथे क्षुल्लक कारणावरून एका तरूणाने वृद्ध व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फुलचंद यादव असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव  असून शाकीरअली शेख असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी शाकीरअली सरमुल्ला शेख याला अटक केली आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, वडाळा संगमनगर येथे राहणारे फुलचंद यादव शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शौचाला गेले होते. ते नैसर्गिक विधी आटोपत असताना शौचालयात रांगेत उभे असलेल्या आरोपी शकीर अलीने दरवाजा जोराने ठोठावला. फुलचंद यांनी शकीरला थोडा वेळ थांबण्यास सांगितले. मात्र, हे ऐकून शाकिरचा राग अनावर झाला. फुलचंद विधी उरकून बाहेर पडताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. प्रचंड संतापलेल्या शाकीरने फुलचंद यांना बेदम मारहाण केली. शाकीरने फुलचंद यांना शेजारी असलेल्या उघड्या नाल्यात फेकून दिले. पाण्यात बुडून फुलचंद यांचा मृत्यू झाला.

 

या घटनेची माहिती मिळताच वडाळा टीटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी शाकिरला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...