आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत घुसून महिलेने केला चाकू हल्ला...14 चिमुरडे गंभीर जखमी; हल्ल्यावेळी मुले खेळत होती मैदानात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनमध्ये चांगमिंग शहरातील एका किंडरगार्टन शाळेत शुक्रवारी सकाळी एका महिलेने चाकू हल्ल्या केला. या हल्ल्यात 14 मुले गंभीर जखमी झाली आहेत. या प्रकरणात महिलेस अटक करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय महिला शाळेच्या स्वयंपाक घरात चाकू घेऊन घुसली होती. तेव्हा मुले मैदानात खेळत होते. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. लियू एवढीच हल्लेखोर महिलेची ओळख सांगण्यात आली.

 

जखमी मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सदर महिला सरकारच्या काही धोरणांवर नाराज असल्याचे प्राथमिक कारण सांगण्यात आले होते.

 

दरम्यान, चीनमध्ये गेल्या काही वर्षांत शाळांसह रेल्वे स्टेशन व इतर गर्दीच्या ठिकाणी चाकूने  हल्ल्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. यंदा जूनमध्ये शांघायच्या एका प्राथमिक शाळेबाहेर 29 वर्षीय व्यक्तीने दोन मुलांवर सुरीने हल्ला केला होता. एप्रिलमध्ये शानशी प्रांतात नऊ शालेय विद्यार्थ्यांवर सुरीने हल्ला झाला होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...