आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहऱ्यावरील 25 तीळ : जाणून घ्या, कोणत्या तिळाचा कसा राहतो प्रभाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरावर जन्मतःच जे छोटे-छोटे काळे ठिपके असतात त्यांना तीळ म्हणतात. या तिळांचा आपल्या स्वभाव आणि भविष्यावर प्रभाव पडत असतो. शास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीरावरील तिळाचे स्थान पाहून जीवनाच्या संबंधी बर्‍याच गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे. येथे जाणून घ्या, चेहऱ्यावरील 25 तीळ आणि याच्याशी संबंधित खास गोष्टी...


1. दोन्ही भुवयांच्या मध्ये तीळ असल्यास व्यक्ती बुद्धिमान असतो. हे लोक बुद्धीच्या जोरावर सर्व कामामध्ये यशस्वी होतात आणि भरपूर पैसा कमावतात.


2. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याजवळ तीळ असेल तर तो व्यक्ती भावूक स्वभावाचा असतो.
3. ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असतो, ते बौद्धिक क्षमतेच्या कामामध्ये इतर लोकांपेक्षा पुढे असतात. यांना बुद्धीच्या संबंधित काम करणे खूप आवडते.


4. ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या खाली तीळ असतो, ते लोक खूप कामुम असतात. या लोकांना इतरांची मदत करणे खूप आवडते.
5. ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याखाली नाकाजवळ तीळ असतो ते स्वभावाने थोडे रहस्यमयी असतात. यांना समजून घेणे फार अवघड असते.


6. जर एखाद्या व्यक्तीच्या नाकाच्या प्रारंभिक स्थानवर मधोमध तीळ असेल तर, तो व्यक्ती कल्पनाशील असतो. हे लोक कोणतेही काम रचनात्मक पद्धतीने पूर्ण करतात.
7. ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याखाली आणि नाकाजवळ तीळ असतो ते स्वतःचा जास्त विचार करणारे असतात.


8. ज्या लोकांच्या एकदम डाव्या डोळ्याखाली तीळ असतो ते वासनात्मक स्वभावाचे असतात. यांचे वैवाहिक जीवनाचे विविध अनुभव असतात.
9. ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याजवळ तीळ असतो ते लोक आपल्या प्रेमासाठी भांडण करणारे असतात. हे लोक आपले प्रेम मिळवण्यासाठी एखादा गुन्हाही करू शकतात.


10. जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असेल तर समजून घ्यावे की,तो व्यक्ती तल्लख बुद्धीचा आहे.
11. नाकावर तीळ असणा-या व्यक्तीला नेहमी प्रवास करावा लागतो. अशा लोकांना प्रेम संबंधांमध्ये विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते.


12. ज्या लोकांच्या उजव्या गालाच्या हाडावर तीळ असतो, ते जास्त भावूक असतात. भावनांच्या आहारी गेल्यामुळे हे संकटात सापडू शकतात.
13. उजव्या गालावर तीळ असणारे लोक जास्त कामुक असतात. जोडीदारासोबत यांचे सतत भांडण होत राहते.


14. उजव्या नाकपुडीखाली तीळ असणारे लोक उच्च विचारांचे असतात.यांचे भाग्य उत्तम असते. स्वतःच्या मनातली गोष्ट कधीही दुस-यांना कळू देत नाहीत.
15. नाकाच्या खाली मधोमध तीळ असणार्या लोकांना स्वच्छंदी राहणे आवडते. या लोकांना प्रवास करणे खूप आवडते.


16. डाव्या ओठाच्या वर तीळ असणारे लोक आपल्या मुलांवर खूप प्रेम करणारे असतात. या लोकांच्या उदारतेमुळे घरामध्ये सुख-समृद्धीचे वातावरण राहते. हे लोक विश्वासपात्र असतात.
17. डाव्या नाकपुडीवर तीळ असणारे लोक कलात्मक पद्धतीने काम करणारे असतात. हे लोक केलेल्या कामामुळे दुसर्यांना नेहमी चकित करणारे असतात. यांचे अनेक प्रेम संबंध असतात परंतु लग्नानंतर जोडीदाराच्या प्रती एकनिष्ठ राहतात.


18. उजव्या बाजूच्या ओठांच्यावर तीळ असणारे लोक बुद्धिमान आणि यांची कल्पनाशक्ती उत्तम असते.
19. उजव्या ओठांच्या एकदम जवळ तीळ असणारे प्रेमी स्वभावाचे असतात.


20. ज्या लोकांच्या डाव्या गालाच्या हाडावर तीळ असतो, त्या लोकांना समजणे फार कठीण असते. हे लोक योजनाकार असतात.
21. ज्या लोकांच्या डाव्या गालावर तीळ असतो, त्यांची बौद्धिक क्षमता उच्च असते. या लोकांना एकसारखे आहे तसे आयुष्य जगणे आवडत नेहमी.


22. डाव्या ओठांच्या एकदम जवळ तीळ असणारे लोक जास्त कामुक असतात. कामुक स्वभामुळे यांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
23. हनुवटीच्या डाव्या बाजूस तीळ असणारे लोक अध्यात्म, धर्मामध्ये आवड असणारे असतात. हे लोक भौतिक सुख-सुविधांकडे आकर्षित होतात.


24. ओठांच्या मधोमध खाली तीळ असणारे लोक दडपणाखाली जगणारे असतात.
25. हनुवटीच्या मधोमध तीळ असणारे लोक परंपरावादी असतात. हे लोक नेहमी कुटुंबाला सुख देण्याच्या प्रयत्नात असतात. इतर लोकांशी यांचे संबध चांगले राहतात. हे लोक स्वभावाने शांत असतात परंतु कधीकधी खूप रागात येतात.

ज्योतिष शास्त्रानुसार तिळाच्या संदर्भात ही एक गोष्टही लक्षात ठेवावी, की शरीरावरील इतर भागांवर असलेल्या तिळाच्या प्रभावामुळे येथे दिले गेलेले फळ बदलू शकतात.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...