Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | kojagiri purnima 2018 goddess lakshmi worship methode

यंदा कोजागरी, अश्विन अशा दोन पौर्णिमा लागोपाठ, अशाप्रकारे करा पूजा; प्रसन्न होईल महालक्ष्मी

रिलिजन डेस्क | Update - Oct 22, 2018, 12:05 AM IST

आज रात्री तुमच्या घरी येईल महालक्ष्मी, धनलाभासाठी करा हे उपाय

 • kojagiri purnima 2018 goddess lakshmi worship methode

  तिथी क्षयामुळे यावर्षी दोन पोर्णिमा आल्या असून कोजागिरी पौर्णिमा मंगळवारी (दि. २३) तर बुधवारी (दि.२४) अश्विन पौर्णिमा आहे. मंगळवारी रात्री 10 वाजून 36 मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरु होत असून बुधवारी रात्री 10 वाजून 14 मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होईल. यामुळे कोजागिरी पौर्णिमा मंगळवार आणि अश्विन पौर्णिमा बुधवारी साजरी केली जाईल. धर्म शास्त्रामध्ये यालाच कोजागरी पौर्णिला म्हणतात. पुराणानुसार शरद पौर्णिमेच्या रात्री भगवती महालक्ष्मी पृथ्वीवर रात्री कोणकोण जागे आहे हे पाहण्यासाठी भ्रमण करते आणि जे लोक जागे असतात त्यांचे महालक्ष्मी कल्याण करते आणि झोपलेल्या लोकांच्या घरात निवास करत नाही.


  धार्मिक ग्रंथामध्ये वर्णीत एका श्लोकानुसार -
  निशीथे वरदा लक्ष्मी: को जागर्तिति भाषिणी।
  जगाति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी।।
  तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महीतले।।


  पूजन विधी
  या व्रतामध्ये हत्तीवर बसलेल्या इंद्र आणि महालक्ष्मीचे पूजन करून उपवास ठेवावा. रात्रीच्या वेळी तुपाचे 101 किंवा यथाशक्ती दिवे प्रज्वलित करून देवघर, बाग, अंगण, तुळस, मुख्य प्रवेशद्वार येथे लावावेत. सकाळी स्नान करून इंद्रदेवाचे पूजन करून ब्राह्मणांना तूप-साखर मिश्रित खीर व मिष्टान्न भोजन, दक्षिणा आणि सोन्याचा एक दिवा दिल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी श्रीसूक्त, लक्ष्मी स्तोत्रचे पाठ करावेत. अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा व्रत केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्व सुख प्रदान करते.


  देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....

 • kojagiri purnima 2018 goddess lakshmi worship methode
 • kojagiri purnima 2018 goddess lakshmi worship methode
 • kojagiri purnima 2018 goddess lakshmi worship methode
 • kojagiri purnima 2018 goddess lakshmi worship methode
 • kojagiri purnima 2018 goddess lakshmi worship methode

Trending