आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅट मालकाकडून धक्कादायक खुलासा...राहुल मुखर्जीने केला होता शीना पत्नी असल्याचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणाला सोमवारी वेगळे वळण मिळाले. सीबीआयच्या कोर्टात फ्लॅट मालकाने धक्कादायक खुलासा केला.फ्लॅट मालिक डोमिनिक मचाडो यांनी कोर्टात सांगितले की, शीना आणि राहुल मुखर्जी त्यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहात होते. दोघांनी खोटे बोलून फ्लॅट भाड्याने घेतला होता. शीना ही पत्नी असल्याचे राहुलने सांगितले होते. एवढेच नाही तर राहुलने फ्लॅट रिकामा केल्यानंतर थकलेले भाडे (70 हजार रुपये) परत करण्‍यात खूप विलंब केला होता. राहुल हा पीटर मुखर्जीचा मुलगा आहे. त्याने आणि इंद्राणीची कन्या शीना बोरासोबत प्रेमसंबंध होते.

 

राहुलने सांगितले शीना अमेरिकेत गेली आहे..

डोमिनिक मचाडो यांनी कोर्टात सांगितले की, राहुल आणि शीनाने सप्टेंबर 2011 मध्ये 18,000 रुपये भाड्याने फ्लॅट घेतला होता. काही महिन्यातच शीना अमे‍रिकेला गेल्याचे राहुलने सांगितले होते. यासाठी त्याला फ्लॅट रिकामा करायचा आहे. भाडे करारावर शीनाची स्वाक्षरी होती. त्यामुळे त्याला शीनाचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC) आणण्यास सांगितले होते. सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, नंतर एक अॅफिडेव्हीट घेऊन आला. परंतु ते कायदेशीर नव्हते.

 

शीनाच्या विरोधात दिली होती पोलिसांत तक्रार..

डोमिनिक मचाडो यांनी सांगितले की, राहुलचे वागणे संशयास्पद वाटत होते. त्यात शीना अचानक अमेरिकेत गेल्याचेही आश्चर्य वाटते होते. या संशयावरून एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये शीनाच्या विरोधात लेखी तक्रार दिली होती. पूर्व सूचना न देता फ्लॅट सोडल्याच मचाडो यांनी तक्रारीत म्हटले होते. डोमिनिक मचाडो यांनी हेही सांगितले की, शीना ही इंद्राणीची छोटी बहीण नसून तिची मुलगी होती.

 

दरम्यान, शीना बोरा हत्याकांड प्रकरणी सीबीआयच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. फ्लॅट मालिकाची साक्ष नोंदविल्यानंतर न्यायाधीशांनी सुनवणी स्थगित केली आहे.

 

कोण आहे इंद्राणी, शीना आणि पीटर?
2002 मध्ये पीटर मुखर्जी आणि इंद्राणी यांचा विवाह झाला होता. पीटर मुखर्जी हे स्टार इंडियाचे सीईओ होते तर इंद्राणी ही आयएनएक्स मीडियाची सीईओ होती. शीना ही इंद्राणीच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. संजीव खन्ना हा इंद्राणीचा दुसरा पती होता. पीटरशी विवाह  करण्‍यासाठी इंद्राणीने संजीव खन्ना यांना घटस्फोट दिला होता.

 

इंद्राणी ही शीनाला आपली छोटी बहीण असल्याचे इतरांना सांगत होती. मुंबई पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी आणि  पीटर मुखर्जीला शीना बोरा हत्याकांडप्रकरणी ऑगस्ट 2015 मध्ये अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...