नागपूर जिल्हा कोर्टात / नागपूर जिल्हा कोर्टात थरार..एका वकीलाने दुसर्‍या वकीलाची कुर्‍हाडीने केली हत्या, नंतर केले विष प्राशन

  • अॅड. लोकेश याने अॅड. सदानंद यांच्यावर कुर्‍हाडीने वार केले

दिव्य मराठी वेब टीम

Dec 22,2018 04:15:00 PM IST

नागपूर- एका वकीलाने दुसर्‍या वकीलाची कुर्‍हाडीने निर्घृण हत्या करून स्वत: ‍विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.21) दुपारी जिल्हा कोर्टाच्या परिसरात घडली. आरोपी वकीलाचे नाव लोकेश पुंडलीक भास्कर असे होते. त्याने अॅड. सदानंद भीमराव नारनवरे यांची निर्घृण हत्या केली.

मिळालेली माहिती अशी की, अॅड.लोकेश हा अॅड.सदानंद यांच्यावर हल्ल्याच्या पूर्ण तयारीनिशी आला होता. अॅड. लोकेश याने अॅड. सदानंद यांच्यावर कुर्‍हाडीने वार केले. नंतर स्वत: विष प्राशन केले. दोघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

X
COMMENT