आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert...'लश्कर-ए-तोयबा' देतेय दहशतवाद्यांना पाणबुड्यांची ट्रेनिंग, सागरीमार्गे हल्ला होण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली- पाकिस्तानी दशतवादी संघटना 'लश्कर-ए-तोयबा' आपल्या दशतवाद्यांना समुद्रात पाणबुड्यांचे प्रशिक्षण देत आहे. यापार्श्वभूमीवर देशावर सागरीमार्गे हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

मीडिया रिपोर्टनुसार, लश्कर आणि दुसर्‍या दहशतवादी संघटना आपली क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परिणामी देशावर सागरी मार्गाने दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत 2008 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. 10 पाकिस्तानी दहशतवादी सागरी मार्गाने देशात घुसले होते.

 

कार्गो शिप किंवा ऑईल टँकर हायजॅक करण्‍याची शक्यता...
रिपोर्ट्स नुसार, नाव न जाहीर करण्‍याच्या अटीवर दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) एका अधिकार्‍याने सांगितले की, 7,517 किलोमीटर लांबीच्या  सागरी सीमेचे रक्षण करणार्‍या कोस्ट गार्ड आणि नेव्हीला अलर्ट जाही करण्‍यात आले आहेत.

 

गुप्तचर यंत्रणेला संशय आहे की, दहशतवादी हल्ला करण्‍यापूर्वी कार्गो शिप किंवा ऑईल टॅंकर हायजैक करून समुद्रात आत्मघातकी हल्ला करू शकतात. विशेषजज्ज्ञांकडून सां‍गितले की, दहशतवाद्यांना दिल्या जात असलेल्या ट्रेनिंगमध्ये डाऊन प्रूफिंगचा समावेश आहे. त्यात पाणबुड्याचे हात आणि पाय बांधलेले असतात. केवळ मान आणि डोक्याच्या मदतीने ते पाण्यावर तरंगू शकतात.

 

लश्कर, जैश आणि या सारख्या दुसर्‍या दहशतवादी संघटना भारताला टार्गेट करण्‍यासाठी दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत आहेत. यात दहशतवाद्यांना पाणबुड्यांचा सराव करून घेतला जात आहे

 

नेव्ही आर कोस्टगार्डकडून मिळालेली माहिती अशी की, लश्कराचे फ्रंट विंग फलाह-ए-इंसानियत फाउंडेशन, अल दावा वाटर रेस्क्यू, लाइफ लाइन वाटर रेस्क्यू आणि रेस्क्यू मिली फाउंडेशन स्वीमिंग पूलमध्ये डीप ड्रायव्हिंग आणि स्विमिंगचे ट्रेनिंग दिले जात आहे. शेखपुरा, लाहोर आणि फैसलाबाद येथे जूनपासून दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सुरु झाले आहे.

 

26/11 हल्ल्यातील आरोपी हेडलीनेही केला होता ट्रेनिंगचा खुलासा...
सागरी मार्गाने दहशतवादी हल्ला करण्‍याचा प्लान पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी तयार केला आहे. दरम्यान, मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली यांनी 'एनआयए'च्या चौकशीत धक्कादायक खुलासा केला होता. याकूब नामक एक व्यक्ती लश्करच्या मरीन विंगचा प्रमुख आहे.

 

मुंबईवर हल्ला करणार्‍या 10 दहशतवाद्यांना पाकिस्तान नेव्हीच्या डीप सी ड्रायव्हरांनी पाणबुड्यांचे ट्रेनिंग दिले होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत सागरी मार्गाने 10 दहशतवादी दाखल झाले होते. या हल्ल्यात 164 जणांना प्राण गमवावा लागला होता तर 304 जण जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...