आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा खून करून तिचे रक्त अंगाला फासणारा अन् पिणाऱ्या क्रूरकर्मा पतीला मरेपर्यंत जन्मठेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा क्रूरपणे खून करून तिचे रक्त सर्वांगाला फासत ते प्राशन केल्याच्या प्रकरणात आरोपी पतीला गुन्हेगार ठरवत त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा लातूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

लातूर येथील इंदिरानगर भागात 2015 साली संजय गायकवाड याने आपल्या पत्नीचा खून केला होता. संजय याने हा खून अत्यंत क्रूर पद्धत अवलंबली होती. त्याने अगोदर पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला, त्यानंतर लोखंडी पहार घेऊन तिच्या डोक्यात घातली. करवतीने मृत पत्नीचे शरीर कापले. एवढेच नव्हे तर मृत पत्नीच्या शरीरातून वाहणारे रक्त आपल्या अंगाला फासून ते त्याने प्राशनही केले. त्यावेळी क्रूर पद्धतीने झालेल्या हत्येची जोरदार चर्चा झाली होती.

 

गांधी चौक पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी डी. बी. वाघमोडे यांनी या प्रकरणाचा तपास केला. पुरावे गोळा करून दोषारोपपत्र दाखल केले होते. तपासामध्ये हा खून करताना आणि पत्नीचे रक्त पिताना संजय गायकवाड याच्या भावाची पत्नी बबिता यांनी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिल्याचा जबाब नोंदवला होता. न्यायालयातही हे जबाब कायम ठेवत त्यांनी साक्ष नोंदवली. हा प्रकार दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत सरकारी वकील व्ही. व्ही. देशपांडे यांनी या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. लातूरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन आरोपी संजय गायकवाडला दोषी ठरवले. संजय याने क्रूर डोक्याने हा खून करून अमानुष प्रकार केला. याबद्दल त्याला फाशीऐवजी मरेपर्यंत जन्मपेठ ठोठावली.

बातम्या आणखी आहेत...