आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लिव्ह इन रिलेशन\'मध्ये राहत होती तरुणी..तरुणाने दिला लग्नास नकार, म्हणून उचलले टोकाचे पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहणार्‍या तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पिंपरीतील सावंगी परिसरात बुधवारी रात्री उशीरा ही धक्कादायक घटना घडली. तरुणीने बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून जीवन संपविले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

या प्रकरणी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. मृत तरुणी गेल्या तीन वर्षांपासून आयटीतील एका तरुणासोबत 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहत आहे. तरुणाचे नुकतेच लग्न ठरले आहे. नंतर तरुणी माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला होता. मात्र, तरुणाने तिला लग्नास नकार दिल्याने तरुणीने राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारून अात्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...