Home | Maharashtra | Mumbai | local train rout affected due to broke in overhead wire at titwala

ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळावरून घसरले; वाहतूक ठप्प, लांब पल्ल्याच्या गाड्याही रखडल्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 14, 2018, 12:55 PM IST

कसारा घाटात शुक्रवारी ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या वाटेतच अडकून

 • मुंबई- कसारा घाटात शुक्रवारी ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या वाटेतच अडकून पडल्या आहेत. त्यामुळे पंचवटी एक्स्प्रेससह बहुतांशी रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅनही रुळावरून घसरल्याने आणखीच गोंधळ झाला आहे. हजारो प्रवासी रेल्वे मार्गावर अडकले आहेत.

  लोकल ट्रेन टिटवाळा ते कसारा दरम्यान सुरु असलेल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली आहे. कसारा-उंबरमाली स्टेशनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेसह लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.

  वाशिंद स्टेशनवर प्रवाशांचे आंदोलन..

  मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल सेवा ठप्प झाल्याने संतप्त प्रवाशांनी वासिंद स्टेशनवर आंदोलन केले. सकाळच्या वेळी चाकरमान्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. रेल्वे सेवा सुरळीत होण्यास दोन-तीन तासांचा कालावधी लागणार असल्याचे समजते.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो आणि फोटो...

 • local train rout affected due to broke in overhead wire at titwala
 • local train rout affected due to broke in overhead wire at titwala

Trending