Home | Maharashtra | Pune | Lover Stick Posters on College Wall of His Girlfriend In Pune

प्रियकराने प्रेयसीला धमकी देणारे पत्रे लावले कॉलेजसमोरील भिंतीवर, पत्र वाचण्यासाठी विद्यार्थ्यांची एकच झुंबड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 12:55 PM IST

एस. एम. जोशी कॉलेजच्या समोरील परिसरात बुधवारी रस्त्यावरील भिंती, खांब तसेच भिंतीवर पत्रे चिटकवलेली आढळून आली.

  • Lover Stick Posters on College Wall of His Girlfriend In Pune

    पुणे- प्रेमभंगातून एका प्रियकराने हडपसर परिसरात एका महाविद्यालयासमोरील भिंतीवर प्रेयसीला धमकी देणारी पत्रे चिटकवल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही पत्रे वाचण्यासाठी कॉलेजमधील युवकांची झुंबड उडाली होती. या प्रकाराची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चिकटवलेली पत्रे काढून जप्त केली.

    मिळालेली माहिती अशी की, हडपसर येथील एस. एम. जोशी कॉलेजच्या समोरील परिसरात बुधवारी रस्त्यावरील भिंती, खांब तसेच भिंतीवर पत्रे चिटकवलेली आढळून आली. हे पत्र प्रेमभंगातून लिहिल्याची माहिती कॉलेजमधील युवकांना कळताच पत्र वाचण्यासाठी विद्यार्थ्याची एकच झुंबड उडाली. दरम्यान, हडपसर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि चिटकलेली पत्रे काढून घेतली. दरम्यान, ही पत्रे आकाश नावाच्या तरुणाने लिहिली आहेत. आकाशचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्यावर्षी कुटुंबीयांना माहिती न देता त्यांनी लग्न केले. मात्र, आकाशच्या आईशी पटत नसल्याने काही महिन्यांपूर्वी ती त्याला सोडून गेली. त्यानंतर त्याने तरुणीची बदनामी करणारे पत्रे चिकटवली.

Trending