धक-धक गर्ल माधुरी / धक-धक गर्ल माधुरी राजकारणात एंट्री करणार.. भाजपची ऑफर स्विकारली पण ठेवली ही एक अट!

  • अमित शहा यांनी माधुरीच्या घरी जाऊन केली होती चर्चा

दिव्य मराठी वेब टीम

Dec 08,2018 02:26:00 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिने राजकारणात प्रवेश करण्यास होणार दिला आहे. माधुरीला पुणे लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची तयारी भाजपने केली आहे. परंतु माधुरीने भाजप समोर एक अट ठेवली आहे. माधुरीला पुण्यातून नव्हे तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवायची आहे.

माधुरीला हवा आहे पूनम महाजन यांचा मतदार संघ..

माधुरीला खासदार पूनम महाजन यांच्या मतदार संघातून उमेदवारी हवी आहे. परंतु हे शक्य नाही. पूनम महाजन ह्या भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. पूनम ह्यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त यांचा 1 लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता.

माधुरीचा पुणे लोकसभेसाठी विचार..
माधुरी दीक्षितला भाजपकडून पुणे लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. माधुरीचे नाव पक्षश्रेष्ठींपर्यंत पाठवल्याचे भाजप नेत्याने गुरुवारी सांगितले. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जूनमध्ये 'संपर्क फॉर समर्थन' या अभियानांतर्गत माधुरीच्या घरी जाऊन चर्चा केली होती.

2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी माधुरी दीक्षित हिला उमदेवारी देण्यावर पक्ष विचाराधीन आहे. माधुरीसाठी पुणे लोकसभा मतदार संघ अनुकूल आहे. देशातील अनेक लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांचे नाव निर्धारित करण्‍याची प्रक्रिया सुरु असून माधुरीचे नाव पुणे लोकसभेसाठी निश्चित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, 51 वर्षीय माधुरी ही ‘तेजाब‘, ‘हम आपके हैं कौन‘, ‘दिल तो पागल है‘, ‘साजन‘ आणि ‘देवदास‘ सारख्या सुपरहिट सिनेमात झळकली होती.

2014 मध्ये पुण्यात भाजपने मारली होती मुसंडी..

2014 मधील लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मुसंडी मारली होती. पुणे लोकसभा संघ काँग्रेसच्या ताब्यात होता. भाजपचे खा. अनिल शिरोळे यांनी पुण्यात कमळ फुलवले होते. तीन लाखाहून जास्त मताधिक्याने विजयी झाले होते.

X
COMMENT