आशिष देशमुखांचा काँग्रेस / आशिष देशमुखांचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर पडणार..पाच वर्षे 'हात' देण्यास काँग्रेसचा नकार

Oct 04,2018 07:46:00 PM IST
नागपूर- गांधी जयंती आणि वर्धेतील काँग्रेसच्या कार्यसमितीचा मुहूर्त साधून आमदारकीचा राजीनामा देणारे भाजपचे आमदार आशिष देेशमुख यांना पाच वर्ष हात देण्यास नकार दिल्यामुळे त्यांचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत शहर काँग्रेसच्या एका मातब्बर नेत्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर यास दुजोरा दिला.

देशमुख यांनी 2 ऑक्टोबरला ई-मेल व फॅक्सने राजीनामा मुंबईला पाठविला. बुधवार 3 ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. 2 ऑक्टोबरला राजीनामा दिल्यानंतर आशिष देशमुख यांनी थेट वर्धा गाठून राहुल गांधी यांच्यासमवेत काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावली. काँग्रेसच्या पदयात्रेतही ते सहभागी झाले होते. देशमुख यांना राहुल गांधींच्या उपस्थितीत प्रवेशाचा मुहूर्त साधायचा होता. परंतु स्थानिक काँग्रेस नेत्यांचा विरोध होता. तसेच पक्षाने त्यांना पाच वर्ष थांबण्यास सांगितले. यामुळेही प्रवेश लांबणीवर पडला. देशमुख पश्चिम नागपुरातून विधानसभेची तिकीट मागण्याची भीती काँग्रेस नेत्यांना वाटत असल्याने त्यांना विरोध झाल्याचे या नेत्याने सांगितले. आता देशमुख यांचा काँग्रेस प्रवेश नाना पटोले यांच्याप्रमाणे दिल्लीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत लवकरच होईल, असे सांगितले जाते.

X