आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर..दिव्य मराठीचे अमोल पाटील, अनुप गाडगेंचाही सन्मान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा 2016 आणि 2017 वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा अनुक्रमे दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर आणि साप्ताहिक विवेकचे संपादक तथा दैनिक दिव्य मराठीचे स्तंभलेखक रमेश पतंगे यांना जाहीर करण्यात आला.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ही घोषणा केली. 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. तसेच दैनिक दिव्य मराठीचे धुळ्यातील पत्रकार अमोल पाटील व अमरावतीतील अनुप गाडगे यांचीही विभागीय पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. 

 

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेले इतर पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत...

2016 वर्षाचे पुरस्कार  
- बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) राजेश जोष्ठे, रत्नागिरी,

 

- अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर):  कांचन श्रीवास्तव मुंबई, बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) :  विजयकुमार सिंह (कौशिक) मुंबई, मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) : महंमद अब्दुल मुख्तार (आबेद) नांदेड, 

 

- पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर) : कपिल श्यामकुंवर यवतमाळ,

 

- सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर) : प्रफुल्ल सुतार कोल्हापूर.

 

विभागीय पुरस्कार: दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग) सूर्यकांत नेटके नगर, अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद विभाग) डॉ. सीतम सोनवणे, लातूर, नानासाहेब परुळेकर पुरस्कार (पुणे विभाग) ज्ञानेश्वर बिजले पुणे, ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार (नागपूर विभाग) - मंगेश राऊत, नागपूर, लोकनायक बापूजी अणे पुरस्कार: (अमरावती विभाग) अनुप गाडगे, अमरावती.  
 
2017 वर्षाचे पुरस्कार  
- बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (राज्यस्तर): लुमाकांत नलावडे कोल्हापूर,

 

- यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (राज्यस्तर): डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी , नाशिक.

 

- पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर): कन्हैया खंडेलवाल, हिंगोली.

 

- केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट: मनीष झिमटे, अमरावती.

 

- स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) - मल्लिकार्जुन सोनवणे, उस्मानाबाद. 

 

विभागीय पुरस्कार: दादासाहेब पोतनीस पुरस्कार (नाशिक विभाग): अमोल पाटील धुळे, अनंतराव भालेराव पुरस्कार (औरंगाबाद विभाग): जितेंद्र विसपुते, दै. पुढारी औरंगाबाद, नानासाहेब परुळेकर पुरस्कार: प्रमोद बोडके सोलापूर, लोकनायक बापूजी अणे पुरस्कार: अनिल माहोरे अकोला.

 

- आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग - जमीर काझी, वरिष्ठ प्रतिनिधी, दै. लोकमत, मुंबई

 

- नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग - प्रमोद बोडके, बातमीदार, दै. सकाळ, सोलापूर

 

- शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग - जान्हवी पाटील, वार्ताहर, दै. तरूण भारत, रत्नागिरी

 

- ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग - अभिजीत डाके, जिल्हा प्रतिनिधी, दै. ॲग्रोवन, सांगली

 

- लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग- अनिल माहोरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. पुण्यनगरी, अकोला

 

- ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग - खेमेंद्र कटरे, जिल्हा प्रतिनिधी, दै. महाराष्ट्र टाइम्स ,गोंदिया

 

2016 व 2017 च्या पुरस्कारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत 2016 साठी पत्रकार राजीव कुलकर्णी, प्रवीण मुळ्ये, पांडुरंग मस्के, राजकुमार सिंग, निलेश खरे, रमाकांत दाणी, राहुल पांडे, बबन वाळके, नितीन तोटेवार यांचा तर  2017 च्या निवड समितीत पत्रकार विजय सिंह, क्लॅरा लुईस, सिद्धेश्वर डुकरे, उमेश कुमावत, भालचंद्र पिंपळवाडकर, शैलेंद्र तनपुरे, सत्यजित जोशी, विलास तोकले, कृष्णा शेवडीकर यांचा समावेश होता.

 

बातम्या आणखी आहेत...