Home | Maharashtra | Pune | Maharashtra Kranti Sena Political Party Form By Maratha Community

‘महाराष्ट्र क्रांती सेना’: मराठा समाजाचा नवा राजकीय पक्ष,पक्षाला उदयनराजे यांचा पाठिंबा

प्रतिनिधी | Update - Nov 09, 2018, 08:23 AM IST

रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आल्याचे समन्वयक सुरेश पाटील यांनी सांगितले.

  • Maharashtra Kranti Sena Political Party Form By Maratha Community

    पुणे - दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर मराठा समाजाच्या वतीने नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ असे या नव्या पक्षाचे नाव आहे. रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आल्याचे समन्वयक सुरेश पाटील यांनी सांगितले. पक्ष स्थापनेच्या या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


    बॅनर्सवर उदयनराजे भोसले.. : मराठा समाजाच्या राजकीय पक्षाच्या बॅनर्सवर साताराचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे छायाचित्र आहे. पक्षाला उदयनराजे यांनी पाठिंबा दिला आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीला उदयनराजे हे आमचे उमेदवार असू शकतात, असेही सुरेश पाटील यांनी यावेळी सांगितले.


    लोकसभा, विधानसभा निवडणूक लढणार
    महाराष्ट्र क्रांती सेना आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढणार आहे. या माध्यमा्तून मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या नऊ संघटनाही आमच्या पाठीशी आहेत. भविष्यात महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या सर्व संघटनांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही सुरेश पाटील यांनी सांगितले आहे.


    दरम्यान, या पक्षाच्या स्थापनेलाच विरोध असल्याचे समोर आले आहे. मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाजातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष स्थापण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

Trending