आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विफ्ट आणि टांग्याचा विचित्र अपघात..टांग्याच्या धुरा गाडीत घुसून चालक ठार, बैल-घोडाही दगावला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन- भोकरदन-जालना मार्गावरील काका पेट्रोल पंपाजवळ भरधाव स्विफ्ट गाडीने व बैल-घोडा टांग्याला जोरदार धडक दिली. टांग्याचा धुरा गाडीत घुसून चालक उमेश गणपत घळे (वय 27, रा. ता.जिंतूर, जि. परभणी) याचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले आहे. गुरुवारी रात्र पावणे अकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात बैल आणि घोडाही दगावला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, उमेश गणपत घळे व श्रीरंग नामदेव काकडे हे स्विफ्ट गाडीने जालन्याकडे निघाले होते. समोरून येणार्‍या बैल-घोडा टांग्याला त्यांच्या गाडीने जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, बैल आणि घोड्याचा जागीच मृत्यू झाला. तर टांग्याचा समोरील लोखंडी धुरा गाडीत घुसून कारचालक उमेश घळे याचा जागेवरच मृत्यू झाला. उमेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातात टांगाचालक शिवाजी साहेबराव मोरे (वय-42,  रा.नांजा, ता.भोकरदन) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी औरंगाबादेत हलविण्यात आले आहेत.

 

श्रीरंग काकडे यांच्या फिर्यादीवरून ,अपघातात मृत झालेला चालक उमेश घळे यांच्या हलगर्जीपणे कार चालवल्याने अपघात झाला. स्वत:च्या, घोडा- बैलाच्या मृत्यूस तोच जबाबदार होता, असे काकडे यांनी पो‍लिसांना माहिती दिली आहे. पुढील तपास जमादार डी. जे.शिंदे हे करीत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...