आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किनगावात किराणा शॉपला भीषण आग, 10 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यातील किनगाव येथे मुख्य चौकातील साईबाबा किराणा दुकानाला भीषण आग लागून सुमारे 10 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री नंतर लागलेल्या या आगीमुळे गावात एकच खळबळ उडाली होती. नागरीकांनी समयसुचकता दाखवता काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठी हानी टळली. साईबाबा किराणा दुकानात शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.

 

दुकानाचे संचालक आकाश देशमुख यांनी शुक्रवारी दिवसभराचा व्यवहारानंतर रात्री 10 वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले. दरम्यान मध्यरात्री नंतर दीड वाजेच्या सुमारास दुकानात अचानक आग लागली. नागरीकांनी त्यांना माहिती दिली. देशमुख यांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने पहाटे चार वाजेच्या सुमारास आग नियत्रंणात आणली. मात्र, तोपर्यंत दुकानातील सुमारे 10 लाखांचे किराणा साहित्य जळून खाक झाले होते.

 

आगीवर नियंत्रण मिळवल्याने दुकानाला लागून रहिवासी वस्ती, कापड दुकान सुरक्षीत करणे शक्य झाले व मोठी हानी तथा दुर्घटना टाळणे शक्य झाले.  घटनेची माहिती मिळताच चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकात सोनवणे, माजी आमदार रमेश चौधरी, सरपंच भूषण पाटील, उपसरपंच राजु पिंजारी, विनोद देशमुख, रोहिदास महाजन, गोटू सोनवणे यांनी नुकसानाची पाहणी केली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... किनगाव येथे किराणा दुकानात लागलेल्या आगीची भीषणता दाखविणारे फोटो

बातम्या आणखी आहेत...